soybean 
मुख्य बातम्या

उन्हाळी सोयाबीनची राज्यात लागवड 

खरिपात ऐन पावसात सापडून सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यासाठी सोयाबीनचा लागवड कालावधी बदलण्याचा प्रयत्न राज्यातील काही गावे करीत आहेत.

टीम अॅग्रोवन

पुणे : खरिपात ऐन पावसात सापडून सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यासाठी सोयाबीनचा लागवड कालावधी बदलण्याचा प्रयत्न राज्यातील काही गावे करीत आहेत. विशेष म्हणजे पहिल्याच टप्प्यात १० हजार हेक्टरवर उन्हाळी लागवडीचा कार्यक्रम हाती घेतल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. 

राज्यात २० वर्षांपूर्वी खरिपात अवघ्या २० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा घेतला जात होता. मात्र त्यानंतर मुख्य कापूस पिकाशी स्पर्धा करीत आता सोयाबीनचे क्षेत्र ४० लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या मागणीत देखील मोठी वाढ होत गेली. शेतकरी सध्या दरवर्षी ३०-३५ लाख क्विंटल सोयाबीन वापरतात. मात्र त्यातील २० लाख क्विंटल बियाणे विकत घ्यावे लागते. खरेदीचे प्रमाण कमी करून शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे, असा सतत प्रयत्न कृषी विभागाचा सुरू आहे. 

विशेष म्हणजे जालना जिल्ह्यातील काही गावे आता ठिबकवर उन्हाळी सोयाबीन लागवड करीत आहेत. उन्हाळी सोयाबीनची लागवड वाढल्यास खरिपासाठी चांगले व दर्जेदार बियाणे मिळण्याचा पर्याय तयार होत आहे. त्यामुळे यंदा दहा हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. 

उन्हाळी सोयाबीन लागवडीचे प्रयोग प्रथमच होत आहेत. त्यामुळे उत्पादकता कमी राहील. मात्र यातून किमान ३० हजार क्विंटल बियाणे हाती येणार आहे. यातील अडचणींचा अभ्यास केला जाईल. मात्र त्यामुळे काही गावे भविष्यात किमान बीजोत्पादनासाठी तरी उन्हाळी सोयबीनकडे झुकण्याची शक्यता आहे, असेही कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

अशी होणार बीजोत्पादनाची वाटचाल 

  • बियाणे बदल व बीजोत्पादनाकरिता उन्हाळी लागवडीसाठी प्रोत्साहन देणे 
  • खासगी बाजारातील बियाण्यांवरील अवलंबित्व कमी करण्याविषयी प्रसार 
  • घरचे दर्जेदार बियाणे तयार करून तेच पुढच्या हंगामासाठी वापरण्यासाठी मार्गदर्शन 
  • बीजोत्पादनात शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन व परवान्यासाठी मदत 
  • बाजारपेठेतील दर्जाहीन बियाणे कंपन्यांना विशेषतः परराज्यांतील कंपन्यांवर बारकाईने नजर ठेवणे 
  • बियाणे उगवण चाचणीसाठी कृषी सेवा विक्री केंद्रांना आग्रह धरणे 
  • दर्जा व गुणवत्ता असलेल्या कंपन्यांच्या मदतीने शेतकऱ्यांमध्ये जागृती मोहीम राबवणे 
  • प्रतिक्रिया पावसात सापडून सोयाबीनची मोठी हानी होते. त्यामुळे मराठवाड्यात आता उन्हाळी सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे. गेल्या हंगामात अनेक गावांमध्ये उन्हाळी सोयाबीनची लागवड झाली. यंदा १० हजार हेक्टरवर लागवड होते आहे. या प्रयोगात उत्पादकता कमी असली तरी ‘क्रॉप पॅटर्न’ बदलासाठी शेतकऱ्यांची दिसत असलेली जिद्द कौतुकास्पद आहे.  - दिलीप झेंडे, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग)  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Village Story: आठवणींची फुलवात...

    El Nino Impact on Monsoon: एप्रिल महिन्यात पाऊस दणका देणार का?

    Water Conservation: जल-सृष्टी व्यवस्थेचे जनकेंद्री पुनरुज्जीवन

    Grain Storage Pest Management: धान्य साठवणुकीतील ‘लेसर ग्रेन बोरर’

    Rural Education Programme: जैवविविधता, शिक्षणाशी जोडणारी मायेसा फाउंडेशन

    SCROLL FOR NEXT