Community Development: मायेसा फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था पर्यावरण शिक्षण, कौशल्याभिमुख शिक्षण, जैवविविधता, आरोग्य, पाणी आणि ऊर्जा या विषयात कार्यरत आहे. राज्यातील वीसहून अधिक महाविद्यालये, शंभरहून अधिक शाळा तसेच विविध गावे आणि समुदायांपर्यंत पोहोचत संस्थेने हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांना पर्यावरणाशी जोडण्याचे काम केले आहे. .गेल्या काही वर्षात वेगाने बदलणाऱ्या जगात पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जाणीव यांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. विशेषतः विद्यार्थी आणि तरुण पिढीमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम, पर्यावरण संवर्धनासाठी जाणीव होण्यासाठी वनस्पती तज्ज्ञ डॉ. शंकर लावरे आणि पर्यावरण विज्ञान विषयात पीएच.डी. करणाऱ्या चैताली क्षीरसागर यांनी एप्रिल २०२१ मध्ये मायेसा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून पर्यावरण विषयक उपक्रमांना चालना देण्यात आली आहे..संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती देताना चैताली क्षीरसागर म्हणाली, की शिक्षण, संशोधन आणि जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून युवकांच्या मनात शाश्वत विकासाची जाणीव निर्माण करणे, शाश्वत विकासासाठी आवश्यक ज्ञान आणि प्रत्यक्ष कौशल्ये प्रदान करणे आणि पर्यावरण संरक्षणासाठी खऱ्या अर्थाने पाऊल उचलणारी जबाबदार पिढी घडविणे हा प्रमुख उद्देश आहे. संस्थेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये आणि समुदाय पातळीवर नियमितपणे कार्यशाळा, व्याख्याने व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन केले जाते. निसर्ग निरीक्षण, प्रात्यक्षिके, गटचर्चा, प्रकल्पाधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली जाते. यामध्ये प्लॅस्टिक मुक्ती, स्वच्छता, जलसंवर्धन, ऊर्जा बचत, वृक्षारोपण, जैवविविधता संवर्धन अशा महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश असतो. संस्थेने पुणे येथे नुकतेच प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे..Environmental Crisis: पर्यावरणाची जीवनरेखा संकटात.कौशल्याभिमुख शिक्षणावर भरशाश्वत विकास साध्य करण्यासाठी संस्थेने पर्यावरणपूरक उपजीविका, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत, जलसंवर्धन, पुनर्वापर व पुनर्निर्मिती यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर भर दिला आहे. यामुळे सहभागी व्यक्तींना केवळ ज्ञानच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनात वापरता येतील अशी कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळते. बदलत्या व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन पर्यावरणाशी संबंधित आधुनिक आणि व्यावहारिक कौशल्ये शिकवली जातात. यामध्ये कार्बन फुटप्रिंट असेसमेंट, शाश्वत संसाधन व्यवस्थापन, पर्यावरणीय लेखापरीक्षण, ईएसजी कल्पना तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात आवश्यक असलेले पर्यावरणीय अनुपालन यांसारख्या विषयांचा समावेश आहे..जैवविविधतेची नोंदस्थानिक वनस्पती व प्राणिजीवनाचे संवर्धन, अभ्यास व नोंदणी करण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. परिसंस्थेतील घटकांमधील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी क्षेत्रभेटी, जैवविविधता सर्वेक्षण, प्रजातींची नोंद आणि निरीक्षणावर भर दिला आहे. या माध्यमातून स्थानिक स्तरावर आढळणाऱ्या दुर्मीळ महत्त्वपूर्ण प्रजातींचे जतन, नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी विविध कृती उपक्रम भर दिला आहे..महिला आरोग्य जागृतीपर्यावरण आणि मानवी आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध लक्षात घेऊन विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात. स्वच्छता, पोषण, सुरक्षित पाणी, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ परिसर यांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन जनजागृती कार्यक्रम, आरोग्य शिबिरे व मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जातात. विशेषतः महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देत स्त्रीआरोग्य, मासिक पाळी स्वच्छता, पोषण, मातृ आरोग्य तसेच अॅनिमिया प्रतिबंध यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले जाते. याशिवाय, आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक तेथे प्राथमिक उपचार सेवा उपलब्ध करून दिली जाते..ग्रीन स्कूल प्रोजेक्टशाश्वत विकास साध्य करण्यासाठी पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी संस्थेने ‘ग्रीन स्कूल प्रोजेक्ट’ या प्रकल्पाची सुरुवात केली. अहिल्यानगर पुणे, नाशिक येथील ग्रामीण आणि शहरी भागातील पन्नासहून अधिक शाळांमध्ये हा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना वृक्षारोपण, पर्यावरणाशी शाश्वत पद्धतीने कसे वागावे, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर कसा करावा आणि भविष्यातील पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आजचे निर्णय कसे घ्यावेत याबाबत मार्गदर्शन केले जाते..या उपक्रमातून शाळांच्या परिसरामध्ये स्वच्छ, निरोगी, सुरक्षित आणि हिरवेगार वातावरण निर्माण केले जाते. तसेच ऊर्जा, नैसर्गिक संसाधने आणि आर्थिक साधनांचा कार्यक्षम वापर केला जातो. शाळेचे वातावरण अधिक निरोगी व पर्यावरणपूरक बनविण्यासाठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासनास सहभागी करून घेतले जाते..Environmental Management: स्थानिक स्वराज्य संस्था,वनसंवर्धन आणि वनसमुदाय.जल, ऊर्जा साक्षरतापाणी संवर्धन, पावसाच्या पाण्याचे पूनर्भरण, जलसाक्षरता आणि स्थानिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. ऊर्जा बचतीच्या दृष्टीने ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर, नवीकरणीय ऊर्जेचा प्रसार, तसेच दैनंदिन जीवनात ऊर्जा बचतीच्या सवयी रुजविण्यावर भर दिला आहे. विशेषतः सौर ऊर्जेच्या प्रसारासाठी संस्थेने उपक्रम हाती घेतला आहे..इन्स्टिट्यूशन बायोडायव्हर्सिटी रजिस्टरसंस्थेच्या माध्यमातून ‘इन्स्टिट्यूशन बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ हा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येतो. यामध्ये कॉर्पोरेट संस्था, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, महाविद्यालय आणि शाळा यांचा समावेश आहे. या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी आणि स्थानिक समुदायामध्ये त्यांच्या परिसरातील वनस्पती व प्राणी जैवविविधतेबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. स्थानिक समुदायाकडे असलेले पारंपरिक ज्ञान आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापनाशी संबंधित माहिती दस्तऐवजीकरण करणे हा प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. जैवविविधतेची नोंद करण्यासाठी एक प्रमाणित स्वरूप विकसित केले असून, ते संबंधित संस्थांना उपलब्ध करून दिले आहे. यामुळे परिसरातील जैवविविधतेचा सर्व्हेक्षण आणि माहिती संकलन केले जाते..परिसरातील वनस्पती, प्राणी, कीटक व इतर जैविक घटकांची यादी.जैविक संसाधनांशी संबंधित पारंपरिक ज्ञान.औषधी वनस्पती व त्यांचा वापर करणाऱ्या पारंपरिक वैद्यांची माहिती.जैवविविधता संवर्धनासाठी समुदायाच्या पद्धती.देवराई संवर्धन आणि नोंद.दुर्मिळ, स्थानिक आणि संकटग्रस्त प्रजातींची नोंद.संभाव्य जैविक संसाधने व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाची जैवविविधता..सीना नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासणीसंस्थेने २०२२ -२३ दरम्यान अहिल्यानगर परिसरातील सीना नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी एक सविस्तर प्रकल्प राबविला. या प्रकल्पाचा उद्देश शालेय विद्यार्थांच्या सहकार्याने पाण्याची गुणवत्ता, प्रदूषणाच्या पातळीचा पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करणे हा होता. या अभ्यासांतर्गत नदीच्या विविध ठिकाणांवरून पाण्याचे नमुने गोळा करून त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासातून नदीपाण्याच्या गुणवत्तेची सद्यस्थिती, प्रदूषणाची कारणे तसेच त्याचे पर्यावरणीय परिणाम तपासले. प्राप्त निष्कर्षांच्या आधारे स्थानिक नागरिक आणि प्रशासनास नदी संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.- चैताली क्षीरसागर, ९०९६१३२०४६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.