जनावरांचे बाजार बंद करण्याची सूचना Suggestion to close animal market
जनावरांचे बाजार बंद करण्याची सूचना Suggestion to close animal market 
मुख्य बातम्या

सांगली : जनावरांचे बाजार बंद करण्याची सूचना 

टीम अॅग्रोवन

सांगली :  लम्पी स्कीन या आजाराचा संसर्ग जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील जनावरांना झाला आहे. कोरोनाच्या लॉकडाउनंतर जनावरांचे बाजार भरणे पुन्हा सुरू झाले आहे, बाजारात जनावरे विक्रीसाठी येत असल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मिरज येथील जनावरांचा बाजार बंद करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत, अशी माहिती विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, ढालगाव, मिरज येथील जनावरांचे बाजार सुरू करण्यात आले आहेत. या बाजारात सांगली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील पशुधनाची खरेदी-विक्रीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे बाजारात आलेल्या जनावरांना लम्पी स्कीन रोगाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे पशुधन दगावण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी लम्पी स्कीन या रोगाचा संसर्ग जनावरामध्ये सुरू झाला.  जिल्ह्यातील जत व कवठेमहांकाळ तालुक्यात सुरुवातीला लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. जत व कवठेमहाकांळ तालुक्यातील सुमारे ४०० जनावरांना लम्पी स्कीन रोगाची लक्षणे आढळून आली आहेत. या दोन तालुक्यांत २२ हजार जनावरांना लसीकरण केले आहे. लम्पी स्कीन हा आजार जनावरांसाठी प्राणघातक असला तरी, जिल्ह्यात या रोगाच्या प्रादुर्भावामुळे जनावरे दगावली नाहीत. पण भविष्यात धोका वाढू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समितीच्या माध्यमातून सुरू असलेले जनावरांचे बाजार बंद करण्याची गरज आहे. बाजार बंद केले तर जनावरांमध्ये लम्पी स्कीनचा होणारा संसर्ग टाळू शकतो. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने मिरज येथील बाजार समिती बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परतु, अद्यापही त्या बाबत मिरज बाजार समितीने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया राज्यातील विविध जिल्ह्यांत चार महिन्यांपूर्वी जनावरांमध्ये लम्पी स्कीन या आजाराची लक्षणे दिसून आली होती. सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांत जनावरांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. संसर्ग टाळण्यासाठी बाजार बंद करणे गरजेचे आहे. आम्ही बाजार समितीला तशा सूचना दिल्या आहेत. -डॉ. सदाशिव बेडक्याळे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT