ऊस लागवड
ऊस लागवड 
मुख्य बातम्या

देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवड कमी करण्याचे आवाहन केले होते. परंतु, त्याचा परिणाम ऊस लागवडीवर झाला नाही. देशात मागील वर्षीच्या तुलनेत ऊस लागवडीत वाढ झाली आहे. मागील वर्षी ४९.९ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. यंदा लागवडीत २ लाख हेक्टरने वाढ होऊन ५१.९ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून मिळाली आहे. दरम्यान, देशातील सर्वच भागांतील ऊस लागवड अंतिम टप्प्यात आहे. तसेच अद्यापही अनेक राज्यांतील लागवडीचे अंतिम अहवाल प्राप्त झाले नाहित, असे कृषी मंत्रालयाने सांगितले.  देशातील सर्वात मोठ्या साखर उत्पादक उत्तर प्रदेशात यंदा विक्रमी ऊस लागवड झाली आहे. उत्तर प्रदेशात २३.९ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षी २३ लाख हेक्टरवर ऊस होता. उत्तर प्रदेशात साखर उत्पादनही यंदा विक्रमी होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी राज्यात १२१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा आतापर्यंचे सर्वाधीक म्हणजेच १२५ लाख टन उत्पादन होणार आहे, अशी माहिती ऊस आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी दिली.  देशातील दुसरे महत्त्वाचे साखर उत्पादक राज्य महाराष्ट्रात ऊस लागवडीत मागील वर्षीच्या १०.८ लाख हेक्टर क्षेत्रात १५.६  टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्रात यंदा साखर उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत बदलण्याची शक्यता नाही. यंदाही मागील वर्षीएवढे १०६ लाख टन उत्पादन होणार आहे. सुरवातीच्या काळात महाराष्ट्रात १२० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज होता. मात्र आॅगस्टमध्ये कोल्हापूर आणि सोलापूर या ऊस पट्ट्यात पिकाला पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे येथील उत्पादन वाढणार नसल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे.  साखर उत्पादनात वाढणार नाही देशात ऊस लागवड वाढली असली तरीही साखर उत्पादन मागील वर्षाएवढेच राहील. देशातील अनेक भागांत ऊस पिकाला पावसाचा खंड आणि अतिपावसाचा फटका बसल्याने त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होणार आहे, असे कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. तर, यंदा देशात विक्रमी ऊस लागवड झाल्याने साखर उत्पादनही आतापर्यंचे विक्रमी राहील. यंदा देशात ३२३ लाख टन लाख उत्पादन होण्याचा अंदाज आहे, असे साखर उद्योगातील जाणकारांनी सांगितले. ‘इस्मा’ या संघटनेने देशात यंदा ३५० ते ३५५ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.   देशातील महत्त्वाच्या राज्यातील ऊस लागवड                                             (लाख हेक्टरमध्ये)  

राज्य २०१८-१९  २०१७-१९
आंध्र प्रदेश  १.३७ १.३४
बिहार     २.६८   २.६४
गुजरात १.८३ १.८६
कर्नाटक ४.३८  ४.२७
महाराष्ट्र   १०.८३   ९.३७
तामिळनाडू    १.८३   २.१८
उत्तर प्रदेश   २३.९०    २२.९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT