कोल्हापूर : थंडीत सातत्य नसल्याने या भागातील ऊस करपा व तांबेऱ्याने पिवळा पडत आहे.
कोल्हापूर : थंडीत सातत्य नसल्याने या भागातील ऊस करपा व तांबेऱ्याने पिवळा पडत आहे. 
मुख्य बातम्या

दक्षिण महाराष्ट्रात उसावर करपा, तांबेऱ्याचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : गेल्या महिन्यात कधी उष्णता तर कधी थंडी असे वातावरण निर्माण झाल्याने त्याचा फटका दक्षिण महाराष्ट्रातील उसाला बसत आहे. नवीन लागवड केलेल्या उसाबरोबरच मोठ्या उसावरही या हवामानामुळे करपा व तांबेऱ्याचा प्रादुर्भाव होत आहे. विशेष म्हणजे नवीन लावणी केलेल्या कोवळ्या उसाच्या पानावरही करपा व तांबेरा दिसत असल्याने या उसाचे भवितव्य अडचणीत आले आहेत.

दक्षिण महाराष्ट्रात उसाचा हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. पहिल्या टप्प्यात उसाची तोड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तातडीने लावणी केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाची उगवण झाली आहे. ही रोपे कोवळ्या अवस्थेत आहेत. तर आडसाली लागवड झालेले ऊस भरणी करण्याच्या अवस्थेत आहेत. काहीची भरणीही झालेली आहे.

पण कोणत्याही स्वरुपात असलेल्या उसावर करप्या व तांबेऱ्याचा प्रादुर्भाव दिसत असल्याने हवामान स्वच्छ असूनही उसाला मात्र त्याचा फटका बसत असल्याचे चित्र आहे.

थंडीत सातत्य नसल्यानेच उसाला हवामानाचा फटका बसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याबाबतच्या तक्रारी प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्राकडे येत असून याची माहिती घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी तातडीने शक्‍य असलेल्या ठिकाणी तरी प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, असे आवाहन प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांनी केले आहे.

कधी उष्ण तर कधी थंडी असे संमिश्र वातावरण असल्याने उसाच्या वाढीत अडथळे येत आहेत. यामुळे करप्या व तांबेऱ्याचा प्रादुर्भाव दिसत आहे. शेतकऱ्यांनी बावीस्टीनची फवारणी एक लिटर पाण्यात एक ग्रॅम या प्रमाणात करावी. स्फुरदची कमतरता असलेल्या जमिनीत प्रामुख्याने रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. - डॉ. अशोक पिसाळ, उस तज्ज्ञ प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर

गेल्या पंधरा दिवसांपासून आमच्या उसाची पाणी पिवळी पडत आहेत. नवीन लागवड केलेल्या, भरणी झालेल्या उसावरही याचा प्रादुर्भाव दिसत आहे. - रमेश जाधव, ऊस उत्पादक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT