Successful cultivation of 'Ara' grape varieties
Successful cultivation of 'Ara' grape varieties 
मुख्य बातम्या

‘आरा’ द्राक्ष वाण लागवडीचा प्रयोग यशस्वी

टीम अॅग्रोवन

नाशिक : निर्यातक्षम द्राक्षाच्या ‘आरा’ या कॅलिफोर्निया वाणाचे ‘उत्पादन व विक्री’बाबतचे भारतातील सर्वाधिकार सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला मिळाले आहे.  आरा १५ व आरा १९ या दोन नवीन वाणांची प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यात लागवड करण्यात आली. या बागांमध्ये द्राक्षोत्पादन घेण्यात आले असून, माल काढणीसाठी आला आहे. या क्षेत्राला आरा वाणांचे संशोधक शकार कार्नेअल, ॲग्रोनॉमिस्ट आंद्रे वेन्मार्क व पॉल सॅनिद त्यांच्या टीमने भेट दिली.

या वेळी सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, अझहर तंबूवाला, सचिन वाळुंज आदी उपस्थित होते.  नाशिक येथील प्रगतशील द्राक्षोत्पादक रवींद्र बोराडे यांनी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे या वाणांची साडेचार एकर क्षेत्रावर लागवड केलेली आहे. चालू वर्षांत बदलत्या हवामानाचा फटका द्राक्षबागांना बसला. अशा परिस्थितीत रंग, आकार व उत्तम टिकवण क्षमता असलेल्या आरा वाणांचे समाधानकारक उत्पादन येथे आले आहे. हे सर्व बघून वाणाचे संशोधक शकार कार्नेअल यांनी समाधान व्यक्त केले. पहिल्या वर्षीच्या उत्पादनांत यशस्वी प्रयोग करण्यात आले. ज्यामध्ये पीक संजीवके व इतर रसायनांचा वापर केला नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत ९० टक्क्यांपर्यंत यश आल्याने श्री. शकार यांनी सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अभिनंदन केले. 

यानंतर राज्य बागायतदार संघाचे तळेगाव (ता. दिंडोरी) दिंडोरी येथील प्रक्षेत्राला भेट दिली. या वेळी द्राक्ष संघाचे कैलास भोसले, रवींद्र बोराडे, माणिकराव पाटील आदी उपस्थित होते. यानंतर द्राक्षोत्पादक श्रीराम ढोकरे यांच्या बागेची पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या आदरातिथ्याने भारावले रवींद्र बोराडे यांच्या शेतात शकार कार्नेअल व त्यांच्या सोबत आलेल्या टीमचा मराठमोळा फेटा व पुष्पगुच्छ घेऊन सत्कार करण्यात आला. या वेळी शकार म्हणाले की, पेरू देशाच्या अभ्यास दौऱ्यात ४० हून अधिक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांना भेटी देऊन पाहणी केली. मात्र, साधे पाणी पिण्यासाठी मिळाले नाही. परंतु, भारत देश आणि येथील शेतकरी महान आहेत. त्यांच्याकडूनच नेहमी सन्मान मिळतो, असे गौरवोद्गार काढले. 

द्राक्ष बागायतदार संघाला सूचक सल्ला द्राक्ष बागायतदार संघाच्या प्रक्षेत्राला शकार कार्नेअल यांनी भेट दिली. हे काम पाहून ते भारावून गेले. संघाकडे भौतिक सुविधा व सभासदांचे संख्याबळ असताना आता जागतिक मानांकन मिळवून काम उभे करावे. यासाठी प्रत्येक सभासदाकडून सामूहिक निधी उभारल्यास द्राक्ष उद्योगात मोठे काम उभे राहील, असे त्यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT