Success of closure of agricultural service centers in Solapur
Success of closure of agricultural service centers in Solapur 
मुख्य बातम्या

सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद यशस्वी

टीम अॅग्रोवन

सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या प्रकरणात कंपन्यांची जबाबदारी असताना, थेट विक्रेत्यांवरच गुन्हे दाखल केले जात असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइडस ऍण्ड सीडस डिलर्स असोसिएशनच्या वतीने बंद पुकारण्यात आला. त्यास शुक्रवारी (ता.१०) प्रतिसाद मिळाला.

पुढील तीन दिवस जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. आधीच कोरोनामुळे दुकानाच्या वेळा कमी होत्या, त्यात आता कृषि सेवा केंद्रांनी स्वतःच बंद पुकारल्याने ऐन हंगामामध्ये  शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि औषधांच्या खरेदीसाठी फटका बसला आहे.  शासनाने परवानगी दिलेल्या कंपन्यांचे बियाणे सीलबंद स्थितीमध्ये शेतकऱ्यांना विकण्याचे काम विक्रेते करतात. बियाणे न उगवण्यामध्ये  विक्रेत्यांचा काहीही संबंध येत नाही. मात्र, तरीही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे योग्य नाही, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सगळीकडे या बंदला प्रतिसाद मिळाला.

सोलापूर शहरासह पंढरपूर, बार्शी, अकलूज, माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढ्यातील आणि ग्रामीण भागातील दुकाने बंद राहिली. आमच्या प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा केला, पण दखल घेतली गेली नाही, त्यामुळे हा बंद करावा लागला. सरकारने सकारात्मक विचार करावा,'' असे माफदाचे भीमराव कौंडुभरी यांनी सांगितले. 

या आहेत मागण्या...

कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दुकानातून तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्याची रक्कम अनेकवेळा मागणी करुनही मिळालेली नाही. विक्रेत्यांकडे मुदतबाह्य कीटकनाशकाची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे संबंधित कंपनीने ती परत घेऊन विल्हेवाट लावावी. नवीन परवाना किंवा नूतनीकरणासाठी आकारण्यात येणारी फी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी आहे, ती सगळीकडे समान करावी. विक्रेत्यांकडे असलेले साठा रजिस्टर संगणकीकृत पद्धतीने ठेवण्यास मान्यता द्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT