पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड  Struggling for crop damage complaints
पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड  Struggling for crop damage complaints 
मुख्य बातम्या

पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड 

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची तक्राररूपी माहिती उपलब्ध पर्यायांच्या माध्यमातून विमा कंपनीपर्यंत पोहोचविण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. या धडपडीत कुणाची तक्रार नोंद तर कुणाचा फक्त वेळ तक्रार नोंदविण्यासाठीच्या प्रयत्नात जात असल्याचे चित्र आहे.  अनेक जिल्हास्तरांवरून तालुकास्तरावर कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत वेळेत पीक नुकसानीच्या तक्रारीसाठी शेतकऱ्यांच्या सोयीकरिता पर्यायांची मेसेज पाठविले जात आहेत. त्यामध्ये तालुका कृषी कार्यालयाकडे ऑनलाइन तक्रार होत नसेल तर ऑफलाइन तक्रार करण्याची सोय सुचविण्यात आली आहे. प्रत्यक्षात काही तालुक्यांमध्ये अशाप्रकारे ऑफलाइन तक्रारच स्वीकारली जात नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दुसरीकडे काही तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कृषी सहायकांना नुकसानीचे पंचनामे करतानाच शेतकऱ्यांची तक्रारही ऑनलाइन करण्यासाठी ऑफलाइन नोंदवून घेण्याची सूचना केल्याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनीच दिली. पुन्हा एकदा झालेल्या पीक नुकसानीची माहिती ऑनलाइन व ऑफलाइन देण्याचा गडबडगुंडा सुरू झाला आहे. त्यातील शेतकरी सांगत असलेल्या अडचणी व अनेक शेतकऱ्यांना माहितीचा असलेला अभाव पाहता शेतकरी वेळेत नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनी पर्यंत पोहोचू शकतील का, वेळेनंतर नंतर येणाऱ्या तक्रारींची दखल विमा कंपन्या घेतील का व त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल का, आदी प्रश्‍न यानिमित्ताने शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

प्रतिक्रिया आमच्या गावातील दहा ते बारा जण ऑनलाइन करत होते. एकाच पण ऑनलाइन तक्रार दाखल झाली नाही. गावातील काल चार ते पाच जणांनी तीन ते सातपर्यंत ऑनलाइन करत होते ते पण झाले नाही. ७२ तासांची वेळ वाढवून द्यायला पाहिजे.  - संदीप लोंढे,  शेतकरी, शेवगळ, जि. जालना 

.प्रतिक्रिया टोल फ्री नंबर लागत नाही. तालुक्यातील प्रतिनिधी म्हणतात, ऑनलाइन तक्रार करा आणि कंपनीचे ॲप चालत नाही. अधिकारी व कर्मचारी म्हणताय ऑफलाइन अर्ज करू नका ऑनलाइन अर्ज सादर करा. अशा वेळेस काय करावे सुचत नाही. नुकसान तर झाले आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा कोण देणार.  - ईश्‍वर सपकाळ,  शेतकरी, तिडका, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद  प्रतिक्रिया

सहा ते सात तास सतत प्रयत्न केल्यानंतर टोल फ्री क्रमांक लागला माहिती नसलेल्या शेतकऱ्याला त्यावर इतके बटनं दाबलं अन् नंतर विचारलेले माहिती आकडे दिन जमल असं वाटत नाही माझ्या या कुटुंबातील आणखी दोन नुकसानग्रस्त खात्याची माहिती देणे बाकी आहे.  -सदाशिव गिते  देवगाव ता. पैठण, जि. औरंगाबाद  ...  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT