Strict closure of agricultural vendors in Varada
Strict closure of agricultural vendors in Varada 
मुख्य बातम्या

वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंद

टीम अॅग्रोवन

अकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी विक्रेत्यास जबाबदार धरून गुन्हे नोंदविण्यात येऊ नये, गुन्हे नोंदविण्याबाबतचा अन्यायकारी निर्णय तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी कृषी व्यावसायिकांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. वऱ्हाडात २५०० पेक्षा अधिक विक्रेते यात सहभागी झाले. त्यामुळे कृषी साहित्य विक्रीचा व्यवसाय पुर्णपणे ठप्प झाला आहे. 

कृषी व्यावसायिक बंदला अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यातील स्थानिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.  त्यानुसार सर्व विक्रेते सहभागी झाले.  शुक्रवारी (ता.१०) एकाही विक्रेत्याने दुकान उघडले नाही. सध्या या  भागात काही ठिकाणी पेरणी, तर काही भागात सोयाबीन, मका पिकावर किडींसाठी फवारणीचे काम सुरु आहे. यासाठी अनेकांना खते, किडनाशकांची गरज आहे. 

नेमका याच काळात बंद सुरु झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. बंद यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनांनी सर्वांना संदेश दिले आहेत. शिवाय, या बंदच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनालाही निवेदन देत अवगत करण्यात आले आहे.  प्रतिक्रिया.. राज्यस्तरीय संघटनेने पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व ५६८ विक्रेते स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले. या आंदोलनाबाबत गुरुवारी (ता.९) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार शुक्रवारपासून हा बंद सुरु झाला. शासनाने विक्रेत्यांच्या मागण्यांकडे सहानुभूतीने लक्ष देऊन आमच्या समस्या सोडवाव्या.   - मोहन सोनोने,  कार्याध्यक्ष, अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघटना.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT