Stormy rain damaged Nanded, Parbhani and Hingoli
Stormy rain damaged Nanded, Parbhani and Hingoli 
मुख्य बातम्या

नांदेड, परभणी, हिंगोलीत वादळी पावसाने फळपिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे, विजांच्या कडकडाटात झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा आदी रब्बी पिके, संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा फळपिके, भाजीपाला पिके तसेच हळदीचे मोठे नुकसान झाले. संचार बंदीमुळे फळे भाजीपाला विक्रीसाठी असलेल्या मर्यादा त्यात ऐन सुगीमध्ये पूर्वमोसमी पावसाने कहर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

मंगळवारी (ता. ३१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ३८ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ३९ पैकी ३६ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये पाऊस झाला.

सध्या उशीरा पेरणी केलेला गहू, ज्वारी, हरभरा या पिकांची काढणी सुरू आहे. हळदीची काढणी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे, विजांच्या कडकडात पाऊस होत असल्याने सुगीची कामे सुरु असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. काढणी केलेली पिके झाकून ठेवण्यासाठी तारांबळ उडत आहे.

वादळी वाऱ्यामुळे आंबा, संत्रा, मोसंबी, लिंबू, अंजीर, द्राक्षाचे नुकसान झाले आहे. संचार बंदीमुळे फळे-भाजीपाला आदीसह शेतमालाच्या विक्रीसाठी मर्यादा आल्या आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)ः नांदेड जिल्हा ः नांदेड शहर १०, नांदेड ग्रामीण १२, तरोडा १२, तुप्पा ३, विष्णुपुरी ७, वसरणी १०, वजीराबाद १२, लिंबगाव ३५, अर्धापूर २, दाभड १०, मुदखेड १४, बारड १५, मुगट ४, हदगाव ५, तामसा ७, मनाठा ६, निवघा २, आष्टी १०, माहूर ८, वाई ३, वानोळा २०, सिंदखेड ८, किनवट १७, इस्लापूर ७, मांडवी १२, बोधडी १२, जलधारा ८, शिवणी ४, कलंबर ६, कापसी ७, शेवडी ८, सोनखेड ९, हिमायतनगर १०, सरसरम ६, जवळगा ५, भोकर १६, किनी ६,उस्माननगर ६.

परभणी जिल्हा ः परभणी शहर १२, परभणी ग्रामीण ११, सिंगणापूर २७, दैठणा १०, झरी १२, पेडगाव १०, पिंगळी १३, जांब १४, पालम १, पूर्णा २२, ताडकळस २४, चुडावा १२, लिमला १४, कात्नेश्वर १२, गंगाखेड २, राणीसावरगाव १, महातपुरी १९, सोनपेठ १४, आवलगाव ९, सेलू ५, देऊळगाव ८, कुपटा २, वालूर ५, चिकलठाणा ६, पाथरी २, बाभळगाव ५, हदगाव २, जिंतूर ५, सावंगी म्हाळसा ४, बोरी ६, चारठाणा ४, आडगाव ५, बामणी १०, मानवत २, केकरजवळा ११, कोल्हा १९.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT