मतदार नोंदणीसाठी राज्यभरात ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिर Statewide for voter registration Special camps in Gram Panchayats
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिर Statewide for voter registration Special camps in Gram Panchayats 
मुख्य बातम्या

मतदार नोंदणीसाठी राज्यभरात ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिर

टीम अॅग्रोवन

नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. नवीन मतदारांची नोंदणी, गावातील लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या महिलांना यादीतून वगळणे तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांची नोंदणी करणे, त्यासोबतच दिव्यांगाची नोंदणी करणे व त्यांना चिन्हांकित करण्याचे काम या शिबिरात करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर., उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार राहुल सारंग उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा यांच्या मतदार यादीचे विश्‍लेषण करण्यात येते. सर्वसामान्यपणे, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ६० ते ७० टक्के असते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उद्योग क्षेत्रात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे मतदानाविषयी जनजागृती करण्यात येऊन नवमतदारांना मतदान नोंदणी प्रक्रियेची माहिती जसे छायाचित्र, नाव, आवश्यक कागदपत्रे आदींची माहिती देऊन जनजागृती करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.  एक नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत उद्योग क्षेत्रात शिबिराचे आयोजन करून नमुना ६, ८ व १४ भरून घ्यावे. या कामात जिल्हा उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक व महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे ते म्हणाले.  औद्योगिक क्षेत्रात मतदार जागृतीसाठी पोस्टर, होर्डिंगद्वारे विस्तृत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासोबतच अधिकार आहे, या बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नागपूर विभागात मतदार जागृती करून मतदारांची टक्केवारी वाढविण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT