नगर, नाशिक, औरंगाबादकडे जाणाऱ्या बस बंद
नगर, नाशिक, औरंगाबादकडे जाणाऱ्या बस बंद 
मुख्य बातम्या

नगर, नाशिक, औरंगाबादकडे जाणाऱ्या बस बंद

टीम अॅग्रोवन

पुणे : मराठा आरक्षण आंदोलन काळात चाकण येथे मोठ्या प्रमाणात बसेची जाळपोळ झाल्याने, शिवाजीनगर येथील एसटी महामंडळातील आगार प्रमुखांनी नगर, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी जाणाऱ्या सुमारे 95 बसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे.  मुंबई, कोकणकडे जाणाऱ्या बस सुरळीत चालू आहे. शिवाजीनगर बस स्थानकातून पुणे जिल्हयातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर या तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या बसच्या फेऱ्याही रद्द केल्या आहेत. परंतु, स्वारगेट येथून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या बसच्या फेऱ्या सुरळीत चालू होत्या. तिकीट बुकीगही बंद असून आज (गुरूवारी) पोलिस विभागाकडून सुचना मिळाल्यानंतर नगर, नाशिक, औरंगाबादकडे जाणाऱ्या बस सोडण्यात येतील अशी माहिती शिवाजीनगर येथील बस स्थानकाच्या आगार प्रमुख एन. पवार यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT