गाेवंश सेवा केंद्रांना प्रत्येकी २५ लाख अनुदानास मंजुरी
गाेवंश सेवा केंद्रांना प्रत्येकी २५ लाख अनुदानास मंजुरी 
मुख्य बातम्या

गाेवंश सेवा केंद्रांना प्रत्येकी २५ लाख अनुदानास मंजुरी

टीम अॅग्रोवन

पुणे : गाेवंश हत्याबंदीनंतर भाकड गाेवंश संगाेपनासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या ‘गाेवर्धन गाेवंश सेवा केंद्रांना द्यावयाच्या अनुदानातील २५ लाखांचे अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मुंबई आणि उपनगर हे दाेन जिल्हे वगळता २१ जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांद्वारे स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक केंद्रांना चार टप्प्यात प्रत्येकी १ काेटी रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामधील पहिला टप्पा शासनाने संबंधित संस्थांना वितरित केला आहे. या याेजने अंगर्तत दुग्धाेत्पादनास, शेतीकामास, पशू पैदाशीस आणि आेझी काम करण्यास उपयुक्त नसलेल्या गाय, वळू, बैल या गाेवंशाचा सांभाळ गाेवंश सेवा केंद्राद्वारे करण्यात येत आहे. पात्र संस्थांची निवड पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे करण्यात आली आहे. देशी गाेवंशाच्या संवर्धन आणि जनुकीय सुधारणांसाठी कृत्रीम रेतन करून घ्यावे, यानंतर पैदास झालेली दर्जेदार गाेवंश शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करावा, तर पशुधनामधील आंतरपैदाशीतून निर्माण झालेल्या वळूंची खच्चीकरण करण्यात यावे आदी सूचना शासनाने संस्थांना केल्या आहेत. अनुदानास पात्र जिल्हानिहा संस्था  

  1. गाेरक्षण संस्था, यवतमाळ 
  2.  श्री गाेपाळकृष्ण संस्था, जळगाव.
  3.  भारतीय उत्कर्ष मंडळ, नागपूर.  
  4.  श्रीकृष्ण गाेरक्षण संस्था, गाेंदिया.  
  5.  गाेकुलम गाेरक्षण संस्था, अमरावती. 
  6.  दिलीपबाबा गाेरक्षण संस्था, वाशीम 
  7.  गाे विज्ञान अनुसंधान संस्था, जळगाव 
  8.  श्री सिद्धगिरी मठ, काेल्हापूर 
  9.  श्री संत संकेश्‍वर जैन युवा मंडळ, साेलापूर 
  10.  श्री संत ज्ञानेश्‍वर माउली, रत्नागिरी 
  11.  श्रीकृष्ण गाेशाळा ट्रस्ट, रायगड 
  12.  विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रम, ठाणे 
  13.  संत जनाबाई महिला मंडळ, पाथर्डी, नगर 
  14.  ब्रह्मचारी साेमेश्‍वर चैतन्य संस्था, नाशिक 
  15.  नवकार शाळा पाजरपाेळ, धळे 
  16.  पांजरापाेळा गाेशाळा सेवा मंडळ, नंदूरबार 
  17.  गाेरक्षण संस्था, साेमनाथपूर उदगीर, लातूर 
  18.  श्री छत्रपती शिवाजी गाेशाळा, परभणी 
  19.  प्रियदर्शनी मागासवर्गीय विकास महिला मंडळ, भाेकर, नांदेड
  20.  गाेरक्षण आदिवासी सेवाभावी संस्था, सेनगाव, हिंगाेली 
  21.  यशवंत बहुद्देशीय सेवाभावी संस्था, बीड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT