सरकारी नोकर भरती सुरू करा Start recruiting government servants
सरकारी नोकर भरती सुरू करा Start recruiting government servants 
मुख्य बातम्या

सरकारी नोकर भरती सुरू करा

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने २०२१ या नव्या वर्षात शासकीय सेवेत सध्या रिक्त असलेल्या एक  लाखापेक्षा जास्त पदांसाठी सुधारित महापोर्टल तयार करून भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.  मागील सरकारने मेगाभरतीचा फुगा फुगवून सुशिक्षित बेरोजगारांची दिशाभूल केल्याने तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. राज्याच्या अर्थचक्राला गती देणारा आणि राज्याच्या विकासात योगदान देणारा हा तरुण वर्ग अशा प्रकारे वैफल्यग्रस्त होणे उचित नाही. राज्यातील शासकीय सेवेत सध्या एक लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त असून, सुशिक्षित आणि होतकरू तरुण वर्ग महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग-१, वर्ग-२ आणि वर्ग-३ च्या सेवाभरती प्रक्रियेकडे डोळे लावून आहे. या संदर्भात होणारा विलंब त्यांच्यात नैराश्य आणि वैफल्य वाढविणारा ठरण्याची शक्यता आहे.  त्यामुळे या संदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे. कोरोनाची परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याने नवीन वर्षात २०२१ पासून ही भरती प्रक्रिया सुधारित महापोर्टलद्वारे तातडीने सुरू करण्यात यावी.  तसेच कोरोना संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे उमेदवारांची वयोमर्यादा अट शिथिल करण्यात यावी, अशी शिफारस पटोले यांनी केली आहे. राज्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांची भावना आणि राज्य सरकारकडून त्यांची असलेली अपेक्षा लक्षात घेता आपण या संदर्भात लक्ष घालून तातडीने पावले उचलाल, अशी अपेक्षा ही पटोले यांनी व्यक्त केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

SCROLL FOR NEXT