spit_1.jpg
spit_1.jpg 
मुख्य बातम्या

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाई; दारू, गुटखा विक्रीवरही बंदी

वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाने आपत्कालिन व्यवस्थापन कायद्यानुसार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार कारवाईचे स्वरुप आणखी कडक करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असून थुंकल्यास दंड ठोठावला जाणार आहे. तसेच दारु आणि गुटखा विक्रीवरही बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर पालिका कायद्यातंर्गत ठिकठिकाणी कारवाई केली जाते. परंतु सध्याची स्थिती पाहता कारवाई आणखी कडक करण्यात आली आहे.  मुंबईत महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला एक हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात येणार असून अशा प्रकारची कारवाई अन्य शहरातही केली जात आहे. यात दिल्लीसह अन्य राज्याचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने बिहार, झारखंड, तेलंगण, उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, हरियाना, नागालँड आणि आसाम राज्यात अगोदरपासूनच सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्प पदार्थ सेवनास आणि थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय दारु, गुटखा, तंबाखू विक्री आणि थुंकण्यावर कडक निर्बध घालण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT