सोयाबीन पेरणी
सोयाबीन पेरणी  
मुख्य बातम्या

सोयाबीनचा पेरा १०२ लाख हेक्टरवर

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली ः देशात कापसाखालील क्षेत्रात घट होऊन तेलबीयांचा पेरा वाढेल अशी शक्यता जणकारांनी पेरणी सुरू होणाच्या आधीच वर्तविली होती. देशात आतापर्यंत १०२ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.  मागील वर्षी तेलबियांचे उत्पादन वाढल्याने दर हमीभावापेक्षा कमी झाले होते. केंद्र सरकारने राज्यांना खरेदी केंद्रे उघडून हमीभावाने खरेदी करण्यास सांगितले. परंतु, सरकारची खरेदी एकूण उत्पादनाच्या १० टक्केही होऊन शकली नाही, असे जाणकारांनी सांगितले. त्यामुळे यंदा शेतकरी तेलबीयांची कमी पेरणी करतील अशी शक्यता होती, मात्र, देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बाेंड अळीने थैमान घातल्याने शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे, हे या आकडेवारीवरून दिसते.  सोयबीन हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे. देशातील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ११३ लाख हेक्टर आहे. यंदा चांगला पाऊस आणि चांगल्या दराच्या अपेक्षेने सोयाबीनच्या पेरणीत १० टक्के वाढ होऊ शेकते. सोयाबीनचा पेरा ११५ लाख हेक्टरवर जाण्याचा अंदाज आहे, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.  हमीभाव वाढीचा परिणाम केंद्र सरकारने २०१८-१९ च्या खरिपात तेलबियांच्या हमीभावात वाढ केली आहे. त्यामुळे मागील वर्षी दर कमी मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांनी यंदा तेलबिया पेरणी अधीक केली आहे. मॉन्सूनच्या काळात चांगला पाऊस आणि हमीभावावाढीने शेतकऱ्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा अधिक केला आहे. केंद्र सरकारने वर्ष २०१७-१८ मध्ये सोयाबीनसाठी ३०५० रुपये हमीभाव जाहिर केला होता. त्यात ३४९ रुपयांनी वाढ करून २०१८-१९ साठी ३३९९ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव शासनाने जाहिर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची जास्त पेरणी केली, अशी माहिती कृषी विभागाने दिली. चांगला पाऊस मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधीक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी जास्त पेरणी केली आहे. मध्य प्रदेशात सरासरीपेक्षा नऊ टक्के अधीक, महाराष्ट्रात १८ टक्के तर राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा १९ टक्के अधीक पाऊस झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. देशात शेतकऱ्यांनी पेरणीस पोषक अशा जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे.मात्र काही भागातील शेतकरी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही पेरणी करत आहेत, असेही कृषी तज्ज्ञांनी सांगितले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

SCROLL FOR NEXT