soybean
soybean  
मुख्य बातम्या

जादा खरेदी दर, नापासच्या अधिक प्रमाणामुळे सोयाबीन बियाणे दरवाढ 

टीम अॅग्रोवन

अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित बियाण्याचे दर वाढविल्याने राज्यभर शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झालेली आहे. बियाण्यांची ही दरवाढ गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उगवण क्षमतेत झालेली घट, बीजोत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या बियाण्याची वाढलेली किंमत व उगवण क्षमतेच्या निकषानुसार नापास झालेल्या बियाण्याची आलेली घट या कारणांमुळे झाली असल्याचा दावा महाबीजच्या करण्यात आला आहे.  याबाबत महाबीजने म्हटले की, सोयाबीन बियाणे विक्रीमध्ये महाबीजचा जवळपास ४५ टक्के वाटा आहे. चांगले बियाणे शेतकऱ्यांना रास्तभावात मिळवून देण्यासाठी सदैव कसोशीने प्रयत्‍न केले जातात. सन २०१९-२० मध्ये राबविलेल्या सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रमामध्ये पीक परिपक्वता अवस्थेत असताना महाराष्ट्र, मध्यप्रदेशात जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीन बियाण्याच्या उगवण शक्तीवर विपरीत परिणाम झाला. परिणाम या खरीप हंगामामध्ये सोयाबीन प्रमाणित बियाण्यांची तुटवडा सदृश परिस्थिती निर्माण झाली. बियाणे मागणीची पूर्तता करण्यासाठी महाबीजव्दारे वेळोवेळी निविदा जाहीर करून तसेच पॅकिंग करून बियाणे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत.  सोयाबीन बिजोत्पादन खरेदी धोरणाप्रमाणे जिल्हानिहाय निवडक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माहे डिसेंबर२०१९ ते जानेवारी २०२० चे सरासरी दर अधिक प्रोत्साहनपर रक्कम या दराने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आले. या कालावधीत बाजारात कमी माल आल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत दर ४४०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान होते. गेल्या खरीप हंगामात महाबीज सोयाबीन जेएस ३३५ बियाण्यांची विक्री किंमत प्रति बॅग १८६० रुपये होती. या खरीप हंगामात २२५० रुपये प्रति बॅग झाली. म्हणजे एकूण वाढ ३९० प्रति बॅग एवढी आहे. ही वाढ जवळपास २१ टक्के आहे. 

खर्चात वाढ  बिजोत्पादकांकडून कच्चे बियाणे २१.५ टक्के वाढलेल्या दरात घेण्यात आले. या कच्च्या बियाण्यांतून प्रक्रिया करताना तसेच उगवण क्षमता चाचणीमध्ये नापास बियाण्याची घट येते. या शिवाय बियाण्याची प्रक्रिया, पॅकिंग, चाचणी इत्यादी तसेच नापास बियाण्याचा खर्च प्रमाणित बियाण्यांच्या किमतीमध्ये समाविष्ट केला जातो. मागील वर्षी परिपक्वतेच्या कालावधीत झालेल्या पावसामुळे नापास बियाण्याचे प्रमाण या वर्षी खुपच अधिक होते. या बाबींचा विचार करता बाजारातील वाढलेले दर, नापास बियाण्याचे अधिक प्रमाण, तुटवडा सदृश परिस्थिती इत्यादी कारणांमुळे महाबीजच्या सोयाबीन बियाण्यामध्ये माफक प्रमाणात दर वाढ झालेली आहे, असे महाबीजच्या विपणन महाव्यवस्थापकांनी दिली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT