Soybean crop fertilizer in Parbhani YouTube Live program on Management
Soybean crop fertilizer in Parbhani YouTube Live program on Management 
मुख्य बातम्या

परभणीत सोयाबीन पीक खत व्यवस्थापनावर ‘यू ट्यूब लाईव्ह' कार्यक्रम

टीम अॅग्रोवन

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाऊंडेशनतर्फे ‘सोयाबीन पीक खत व्यवस्थापन' विषयावर ‘यू ट्यूब लाईव्ह' कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (ता.११) करण्यात आले. 

विस्तार शिक्षण संचालक डॉ. डि. बी. देवसरकर, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत आदीं सहभागी झाले होते. 

डॉ. देवसरकर म्हणाले, ‘‘सोयाबीन हे जागतिक पातळीवर आधुनिक शेतीमधील महत्वाचे तेलबिया, शेंगवर्गीय पीक आहे. सोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के तेल असते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे.

एकूण प्रथिनांपैकीं जवळजवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीनपासून उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतके उत्पादन मिळते. कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे.’’ 

डॉ. आळसे म्हणाले, ‘‘सोयाबीन पिकास शिफारशीनुसार नत्र, स्फुरद,पालाश अधिक गंधक पेरणीवेळी द्यावे. जमिनीत जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास शिफारशीनुसार झिंक सल्फेट पेरणीवेळी द्यावे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने शिफारशीनुसार बोरॅक्स पेरणीवेळी द्यावे.’’  पटाईत म्हणाले, ‘‘खोडकिडी, पाने खाणाऱ्या अळ्या, हुमणी कीड तसेच रोग व्यवस्थापन, यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.’’ रिलायन्स फाउंडेशनचे विलास सवाणे, शुभम लाखकर, मनोज काळे, रामाजी राऊत आदींनी पुढाकार घेतला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : गव्हाचे भाव टिकून ; कापूस, सोयाबीन, मका, तसेच कांद्याचे काय दर आहेत?

Maharashtra Rain : विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता 

Farm Enumeration : शेतमोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सक्ती

Heavy Rain : खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच

Agriculture workshop : पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसाय करा : ढगे

SCROLL FOR NEXT