soybean
soybean  
मुख्य बातम्या

राहात्यात अडत्यांना टाळून सोयाबीनचे लिलाव  

टीम अॅग्रोवन

नगर ः माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राहाता (जि. नगर) बाजार समितीत अडत्यांना टाळून शुक्रवारी (ता. ९) सोयाबीनचे लिलाव झाले. त्यामुळे प्रती क्विंटलमागे शंभर रुपये दर वाढही मिळाली. खरेदीदार व्यापाऱ्यांनीही या उपक्रमाला प्रतिसाद दिला. थेट लिलावात प्रती क्विंटल साधारण ३८०० रुपये दर मिळाला तर चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ३ हजार ९५५ रुपयांचा दर मिळाला असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.   राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी पूर्वी त्यांच्या ओळखीच्या अडत्याच्या गाळ्यात शेतमाल उतरवत. नंतर व्यापारी गाळ्याजवळ जाऊन त्याचा लिलाव करीत. त्यात बऱ्याचदा अडत्याला हस्तक्षेपाची संधी मिळे. त्याचा हस्तक्षेप टाळून थेट शेतमालाचा लिलाव करण्याची सूचना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्यानुसार त्याला शुक्रवारी प्रारंभ झाला आणि अडत्यांना टाळून शेतकऱ्यांच्या वाहनांजवळ जाऊन शेतमालाचा लिलाव करण्याची नवी पद्धत सुरु केली.  व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यानंतर अडत्यांनीही त्यांची भूमिका बदलली आणि तेही व्यापाऱ्यांसारखे खुल्या लिलावात खरेदीसाठी सहभागी झाले. तुलनेत अधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला. पोत्यामागे १०० रुपयांनी दर वाढल्याने गावोगावी वजनकाटे मांडून खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही अधिक भाव देण्याची वेळ आली.

सरासरी ३८०० रुपये दर मक्तेदारी कमी झाली आणि खुली स्पर्धा झाली, तर शेतमालाला अधिक भाव मिळण्याची शक्‍यता वाढते, असे पहिल्यांदाच बाजार समितीत दिसले. अडत्यांचे दडपण व हस्तक्षेप नसल्याने, सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ३८०० रुपये भाव मिळाला. दिवसभरात ५०० हून अधिक पोत्यांची आवक झाली. उत्तम प्रतीचे सोयाबीन ३९५५ रुपये क्विंटल दराने विकले गेले. लिलावासाठी बाजार समितीचे दोन अधिकारी व तीन कर्मचारी तैनात केले होते. हमाली व तोलाई वगळता शेतकऱ्यांच्या पट्टीत कुठलीही कपात नाही. शिवाय पैशाची हमी, हे येथील सूत्र आहे असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

Commodity Market : हळद, मुगाचे भाव वधारले

SCROLL FOR NEXT