खानदेशात बाजरीची पेरणी सुरू
खानदेशात बाजरीची पेरणी सुरू 
मुख्य बातम्या

खानदेशात बाजरीची पेरणी सुरू

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः खानदेशात बाजरीची पेरणी सुरू झाली असून, यंदा क्षेत्र मागील हंगामाच्या तुलनेत काहीसे वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  मक्‍याची लागवड काही शेतकरी लष्करी अळी व इतर समस्यांमुळे टाळून बाजरी पेरणीस पसंती देत आहेत. बाजरीची पेरणी धुळे, शिंदखेडा, शहादा, जळगावमधील पाचोरा, जामनेर, जळगाव, चाळीसगाव या भागांत अधिक होईल, अशी स्थिती आहे. बाजरीचे दर मागील वर्षभरापासून २२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळत आहेत. खरिपात बाजरीचे पीक पुरते वाया गेले. आता रब्बीमध्ये बाजरीचे पीक घेण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. बाजरीवर अमेरिकन लष्करी अळीचा धोका नसतो. सतेच सुमारे ६५ ते ७५ दिवसांत पीक मळणीवर येते. बाजरीचा चाराही पशुधनासाठी सकस मानला जातो. यामुळे शेतकरी बाजरी पेरणीकडे वळत आहेत.  मागील हंगामात खानदेशात मिळून सुमारे पाच हजार हेक्‍टरवर बाजरीची पेरणी झाली होती. यंदा सुमारे सहा ते साडेसहा हजार हेक्‍टरवर पेरणी अपेक्षित आहे. खानदेशात सतत ढगाळ वातावरण आहे. मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाल्याने पेरणीबाबतची धावपळ सुरू झाली आहे. कारण, पाऊस आल्यास पेरणीत अडथळा येईल. वाफसा मिळणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कृत्रिम जलसाठे आहेत, ते शेतकरी कापूस व इतर पिकांखालील क्षेत्र रिकामे करून बाजरीची पेरणी करीत आहेत. पेरणी जानेवारीच्या अखेरपर्यंत सुरू राहील. अनेक शेतकरी संकरित, संशोधित वाण पेरणीस पसंती देत आहेत. दीड किलोची एक बियाण्यांची बॅग किंवा पिशवी ३०० रुपयांपासून मिळत आहे. तापी, गिरणा, अनेर, वाघूर, पांझरा आदी नद्यांना चांगले प्रवाही पाणी नोव्हेंबरपर्यंत होते. यामुळे पाण्याचा प्रश्‍न नदीकाठी यंदा फारसा भासणार नाही, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT