Sorghum purchase stopped in Jalgaon district 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात ज्वारीची खरेदी बंद

जळगाव : शासकीय ज्वारी खरेदी बुधवारी (ता.३०) लक्ष्यांक पूर्ण झाल्याने बंद करण्यात आली. नोंदणीधारक ज्वारी उत्पादक शेतकरी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करीत आहेत.

टीम अॅग्रोवन

जळगाव : शासकीय ज्वारी खरेदी बुधवारी (ता.३०) लक्ष्यांक पूर्ण झाल्याने बंद करण्यात आली. नोंदणीधारक ज्वारी उत्पादक शेतकरी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करीत आहेत. 

पंचवीस हजार क्विंटल ज्वारी खरेदीचा लक्ष्यांक जिल्ह्यास प्राप्त झाला होता. खरेदी वेगात सुरू झाली. सुमारे पाच ते सहा दिवस खरेदी केंद्र सुरू होते. मात्र, लक्ष्यांक पूर्ण झाल्याने ज्वारी खरेदी बंद झाली. तसेच मका, बाजरीची देखिल खरेदी या सोबतच बंद झाली. मका, बाजरी खरेदीस मात्र प्रतिसाद मिळाला नाही. लक्ष्यांकाच्या तुलनेत ३५ हजार क्विंटल मक्याची कमी खरेदी १७ केंद्रांमध्ये झाली. मक्याचे दर बाजारात हमीभावापर्यंत पोचल्याने खरेदीला प्रतिसाद मिळाला नाही.  ज्वारीची शासकीय केंद्रात विक्रीसाठी जिल्ह्यात सुमारे १० हजार ६०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. परंतु यांपैकी निम्म्या ज्वारी उत्पादकांच्या ज्वारीची खरेदी शासकीय केंद्रात झालेली नाही. बाजारात ज्वारीचे दर हमीभावाच्या तुलनेत कमी आहेत. दर १४०० ते १८५० रुपये प्रतिक्विंटल आहेत. दादर ज्वारीचे दरही कमीच आहेत. ज्वारीला शासकीय केंद्रात २५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर आहे. यामुळे शासकीय खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. 

हरभऱ्याची सुमारे ७६ हजार क्विंटल खरेदी 

हरभरा खरेदीसही शासनाने मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्याने हरभरा खरेदीदेखील बंद झाली आहे. हरभऱ्याची सुमारे ७६ हजार क्विंटल खरेदी १४ खरेदी केंद्रांमध्ये झाली आहे, अशी माहिती मिळाली.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement: शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्रे अडकली कुठे?

Pomegranate Price: आवक कमी असल्याने डाळिंबाचे दर टिकून

PM Kisan Benefits: ‘पीएम किसान’चा दुहेरी लाभ रोखण्याच्या हालचाली

Maharashtra Weather: तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज

PM Kisan 21st Installment: 'या' दिवशी मिळू शकतात पीएम किसानचे २ हजार रुपये?; २१ व्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT