agriculture department
agriculture department  
मुख्य बातम्या

शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित 

टीम अॅग्रोवन

पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी प्रमाणभूत पद्धत (एसओपी) निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे राज्यभर तातडीने शेतीशाळा सुरू करा, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.  राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) व विभागीय कृषी सहसंचालक (जेडीए) यांना यंदा शेतीशाळेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे सांगण्यात आले आहे. शेतीशाळेमुळे शेतकऱ्यांना पीक नियोजन, व्यवस्थापन व उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. त्यामुळे लागवडीच्या कालावधीपासून या उपक्रमाचे चांगले नियोजन करावे, असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे. 

गेल्या हंगामात झालेल्या शेतीशाळांच्या धर्तीवरच योजनानिहाय नियोजन यंदाच्या शेतीशाळांचे करावे. त्यासाठी नव्या एसओपीचा वापर करावा, शेतीशाळा पीकनिहाय घ्याव्यात, त्यासाठी विषय व वेळापत्रकाचा वापर करावा, असे कृषी संचालक विकास पाटील (विस्तार व प्रशिक्षण) यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कळविले आहे. 

‘‘राज्यात १५ मेपासून शेतीशाळा सुरू करण्याच्या सूचना आम्हाला कृषी आयुक्तालयाने दिल्या होत्या. तथापि, कोरोना साथीची प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पसरला आहे. यामुळे क्षेत्रीय कर्मचारी यंदा शेतीशाळा सुरू करण्यासाठी अजिबात इच्छुक नाहीत. मुळात, ग्रामीण भागात खरोखर हा उपक्रम चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ देखील उपलब्ध नाही,’’ असे विदर्भातील एका ‘एसएओ’ने स्पष्ट केले.  शेतीशाळा टाळता येणार नाही  कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, ‘‘कोरोनाची स्थिती असली तरी हा उपक्रम कोणत्याही तालुक्याला टाळता येणार नाही. शेतीशाळा वेळेत सुरू झाल्या तरच शेतकऱ्यांना खरिपात लाभ होईल. शेतीशाळांसाठी गुगल फॉर्मचा वापर यंदा केला जाणार आहे. कोरोनाची स्थिती असली तरी हा उपक्रम कोणत्याही तालुक्याला टाळता येणार नाही.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

Loksabha Election : कसबा पॅटर्नची संधी साधणार की हुकणार

Water Scarcity : पुणे विभागात पाण्यासाठी वणवण

Cotton Production : भारत कापूस उत्पादनात पडतोय पिछाडीवर

SCROLL FOR NEXT