सोलापूरचा ‘रेशीम ब्रॅंड' तयार करू : देशमुख
सोलापूरचा ‘रेशीम ब्रॅंड' तयार करू : देशमुख 
मुख्य बातम्या

सोलापूरचा ‘रेशीम ब्रॅंड' तयार करू : देशमुख

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्हा वस्त्रोद्योगात अग्रेसर आहे. येथे सुतासह चादर व इतर वस्त्रोत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मोठ्या प्रमाणात असलेले रेशीम उत्पादक शेतकरी व रेशीम उद्योगाचे प्रश्‍न सोडवून सोलापूरचा ‘रेशीम ब्रॅंड'' तयार करू, असे आश्‍वासन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे विकासनगर येथे  देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ‘रेशीम उद्योग विकास सृजन संवाद’ बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी रेशीम अधिकारी शरद जाधव, विकास आगवणे, संजय देशमुख, रेशीमतज्ज्ञ डॉ. संतोष थिटे, नवनाथ रसाळ, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, भीमराव पवार, दीपक घायतिडके, सुग्रीव देवकर आदींसह रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘‘सोलापूरची रेशीम जिल्हा म्हणून नवी ओळख निर्माण करण्यासाठी कोणत्या अडचणी आहेत, त्या सोडविण्याच्या उपाययोजना; तसेच हिरज येथे होणाऱ्या रेशीम संशोधन केंद्राच्या माध्यमातून कशा स्वरूपाचे काम करता येईल, याबाबत रेशीम उत्पादकांनी सूचना द्याव्यात. शासनाकडून अनुदानाची अपेक्षा करण्यापेक्षा योगदानातून आपला विकास करण्याकडे भर असावा. स्थानिक स्तरावरील अडचणी त्वरित सोडवू.``

या वेळी रेशीम उत्पादक, तज्ज्ञ अभ्यासक नवनाथ रसाळ, सोमनाथ शिंदे आदी शेतकऱ्यांनी सूचना मांडल्या. मुख्य समन्वयक दत्तात्रय चौगुले यांनी प्रास्ताविक केले. सल्लागार शिवाजी पवार यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT