सोलापुरात पहिल्याच दिवशी मृगाची जोरदार हजेरी
सोलापुरात पहिल्याच दिवशी मृगाची जोरदार हजेरी 
मुख्य बातम्या

सोलापुरात पहिल्याच दिवशी मृगाची जोरदार हजेरी

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ८) पहाटे पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन दिवसांपासून आधीच सुरू असलेला पाऊस आणि गुरुवारी मृग नक्षत्राच्या आगमनाच्या मुहूर्तावर पुन्हा सुरू झालेला त्याचा जोर, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अक्कलकोटपासून ते शेवटच्या सांगोला, करमाळा, माळशिरसपर्यंत सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पहिल्याच पावसाने खरिपाच्या पेरा वेळेत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शुक्रवारी (ता. ८) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांपर्यंत सरासरी ११.६० मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची थांबून-थांबून रिपरिप सुरू आहे. गुरुवारी दिवसभर कधी ऊन कधी ढगाळ असे वातावरण होते. तापमानही काहीसे कमी होते. सायंकाळी सातच्या सुमारास वातावरणात पुन्हा बदल झाला, पण काही ठराविक भागातील पावसाची हलकी हजेरी वगळता पावसाचा जोर कमीच होता. पण शुक्रवारी पहाटे पुन्हा चार वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल चार तासांपर्यंत तो बरसतच होता.

सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माळशिरस भागांत सर्वदूर पाऊस झाला. पण सर्वाधिक जोर उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर, मोहोळ भागांत राहिला. गेल्या वर्षी याच दिवशी केवळ सरासरी ४.११ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. यंदा मात्र, पावसाने आधीच आणि वेळेवर सुरवात केल्याचे दिसते. या पावसाचा जोर एवढा होता की अनेक ठिकाणी शेतशिवारात पाणी साचून राहिले. ओढे, नाले भरून वाहू लागले.

जलयुक्तशिवार आणि पाणी फाउंडेशनअंतर्गत अनेक गावांत पाणी अडवण्याची विविध प्रकारची कामे झाली आहेत, आज या सर्व पाणलोटक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिले आहे. त्याचा फायदा यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना होणार आहे. मुळात, यंदा वेळेवर पावसाने सुरवात केल्याने वाफसा मिळाल्यानंतर खरिपाच्या पेरण्या सुरू होण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT