Solapur district once again pre monsoon rain
Solapur district once again pre monsoon rain  
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा

टीम अॅग्रोवन

सोलापूर : जिल्ह्यात सलग दुसऱ्यादिवशी सोमवारी (ता.२०) पहाटे पावणे एकच्या सुमारास पुन्हा एकदा सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दोन दिवसांत शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागला. एकीकडे ‘कोरोना’मुळे ओढावलेले संकट आणि दुसरीकडे अवकाळीच्या सततच्या हजेरीमुळे शेतकरी पुरता घायकुतीला आला आहे. 

जिल्ह्यात पंढरपूर, सांगोला, माढा, करमाळा, उत्तर सोलापूर, मोहोळ या भागात शनिवारी रात्री आणि रविवारी काही भागात सलगपणे पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी रात्रीपासूनचच वातावरणात बदल जाणवत होता. वारेही सुटले होते. पहाटे पावणेएकच्या सुमारास पुन्हा वातावरण बदलले आणि काहीच वेळात वादळवारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर हा पाऊस पडत होता. त्यानंतरही पावसाची रिपरिप चालूच होती. 

मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर, पंढरपूर भागात या पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात एकदमच बदल झाला आहे. सध्या द्राक्ष, डाळिंब, केळी यांचा फळ काढणीचा हंगाम सुरु आहे. तसेच कांदा, भाजीपालाही सुरु आहे. पण, बाजारपेठा बंद असल्याने शेतकरी अडचणीत आला असताना, आता अवकाळीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. ‘कोरोना’चे ढग आधीच जमल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. सततच्या या अवकाळी पावसाने त्यात आणखी भर पडली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT