फायदेशीर शेतीसाठी माती परीक्षण महत्त्वाचे
फायदेशीर शेतीसाठी माती परीक्षण महत्त्वाचे 
मुख्य बातम्या

फायदेशीर शेतीसाठी माती परीक्षण महत्त्वाचे

टीम अॅग्रोवन

सवना, यवतमाळ : शेती फायद्याची करण्यासाठी उत्पादकता खर्च कमी करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने माती परीक्षण हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा ठरतो, असे प्रतिपादन `केव्हीके`चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी केले. 

`सकाळ ॲग्रोवन`, `महाधन` यांच्यातर्फे येथील ग्रामपंचायत कार्यालयात `ॲग्रोवन संवाद` चर्चासत्र घेण्यात आले. सरपंच ॲड. खुशाल महागावकर, `महाबीज`चे जिल्हा व्यवस्थापक पी. एम. देशमुख, `महाधन`चे प्रदीप कायंदे, प्रदीप महल्ले, संदीप वऱ्हाडे, आशिष माळी उपस्थित होते.

जिल्ह्यात रेशीम शेतीखालील क्षेत्र वाढत आहे. परिणामी अनेक गावांमध्ये समृद्धी आली आहे. अशा प्रकारच्या फायदेशीर शेतीच्या पॅटर्नचे अनुकरण व्हावे, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्‍त केली. केळीसह इतर व्यवसायिक पीकपद्धतीविषयीदेखील या वेळी त्यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

माळी यांनी सूत्रसंचालन केले. `ॲग्रोवन`चे प्रतिनिधी नितीन चव्हाण यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT