पावसाअभावी धीम्या गतीने खरिपाच्या पेरण्या सुरू
पावसाअभावी धीम्या गतीने खरिपाच्या पेरण्या सुरू 
मुख्य बातम्या

पावसाअभावी धीम्या गतीने खरिप पेरण्या सुरू

टीम अॅग्रोवन

पुणे ः पावसाचा जून महिना गेला तरी अनेक ठिकाणी अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे बहुतांशी ठिकाणी पेरण्या खोळंबल्या असून, पुरेशा पावसाअभावी पेरण्या धिम्या गतीने सुरू आहेत. पुणे विभागात आत्तापर्यंत पुणे विभागात सात लाख ८८ हजार ४८० हेक्टरपैकी ४३ हजार १२३ हेक्टर म्हणजे पाच टक्के पेरण्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.  

यंदा जोरदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना लागून होती. मात्र, मॉन्सून उशिराने दाखल झाल्याने पुणे विभागात अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस पडला. पुणे विभागात जून महिन्यात नगर जिल्ह्यामध्ये १०३.० मिलिमीटर; तर पुणे जिल्ह्यामध्ये १६९.५ मिलिमीटर व सोलापूर जिल्ह्यामध्ये ६९.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत विभागातील बहुतांशी भागात हलक्या सरी बरसल्या आहेत. ही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. सध्या पुणे आणि सोलापूरमध्ये पेरण्यांना सुरवात केली असली तरी पुरेसा पाऊस न झाल्यास हंगाम वाया जाण्याची भीती आहे.

सध्या नगर जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या पूर्वमशागतीची कामे पूर्ण झाली आहेत; तर काही ठिकाणी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अकोले तालुक्यात ७६४ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये पूर्वेकडील शिरूर, दौड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड या तालुक्यांत अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून इंदापूरमध्ये तुरळक ठिकाणी बाजरी, तूर, मगू, मका, भुईमूग व सोयाबीन पिकांच्या अल्प पेरण्या झाल्या आहेत. भात पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात भात व नाचणीच्या रोपवाटिकेत रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. सोलापूरमध्ये हंगामातील पिकांच्या पेरणीस सुरवात झाली असून बाजरी, मका, उडीद, मूग, तूर, सोयाबीन व सूर्यफूल पिकांचे अल्प प्रमाण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT