Skill based training for farmers and agricultural laborers at Wakhari
Skill based training for farmers and agricultural laborers at Wakhari 
मुख्य बातम्या

वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण

टीम अॅग्रोवन

पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व बारामती कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मका पिकावर फवारणी करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना कौशल्य आधारित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. दौंड तालुक्यातील वाखारी येथील शेतकरी जीवन शेळके यांच्या शेतावर हे प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल व आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांच्या समन्वयाने हे प्रशिक्षण घेण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल म्हणाले की, शेतकऱ्यांनी कीटकनाशकांवरील माहिती वाचावी आणि त्यांच्यासोबत येणारे विविध माहितीपत्रक वाचून त्याप्रमाणे काळजी घ्यावी. कीटकनाशकांची सरमिसळ करून फवारणी टाळावी. किडीच्या प्रादुर्भावानुसार फवारणी यंत्र व नोझलची निवड करावी. यंत्रे सुट्टे भाग, इंजीन पंप, फवारणी यंत्राची निगा व देखभाल, कीटकनाशकांचा नेमका व सुरक्षित वापर करण्याची पद्धत व वापर करताना योग्य ती काळजी घ्यावी.

बारामती कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. मिलिंद जोशी म्हणाले की,  शेतकऱ्यांना मका पिकांसाठी कोणकोणत्या प्रकारची कीटकनाशके वापरावीत व कोणत्या प्रकारची वापरू नयेत याची माहिती तंज्ज्ञाकडून घ्यावी. तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन, जैविक कीड नियंत्रण करताना योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.

यावेळी प्रकल्प उपसंचालक पुनम खटावकर, बारामती केव्हीकेचे शास्त्रज्ञ संतोष करंजे, सचिन गाढवे, दीपक राजमाने, सचिन बारवकर, कृषी पर्यवेक्षक दिलीप यादव, कृषी साहाय्यक महेश पाटील, मच्छिंद्र कुदळे, गणेश कदम, तुकाराम रडे, कृषिमित्र हनुमंत जगताप, समाधान शिंदे, भिमराव दिवेकर, अतुल टेंगले, दत्तात्रय भोसले, योगेश भोसले, काका शेळके, केशव होले व शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी प्रास्ताविक केले. तर गणेश कदम यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT