कृषिक प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय करारांचा ‘षटकार’
कृषिक प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय करारांचा ‘षटकार’ 
मुख्य बातम्या

कृषिक प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय करारांचा ‘षटकार’

ज्ञानेश्‍वर रायते

बारामती, जि. पुणे ः बारामतीचे कृषिक प्रदर्शन किंवा कोणताही मोठा शेतीविषयक कार्यक्रम हा अलीकडे आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारांनी युक्त असाच असतो. मात्र, शेती, विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाबरोबर शेतीच्या विकासासाठी गुरुवारी (ता. १७) एक, दोन नव्हे तर तब्बल सहा सामंजस्य करार झाले. जे भविष्यात शेतीच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहेत.

आजच्या कृषिक प्रदर्शनात अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र व देशातील अनेक संस्थांमध्ये वेगवेगळे सामंजस्य करार झाले. हे करार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

या करारांमध्ये इक्रिसॅटसमवेत महत्त्वाचा सामंजस्य करार झाला. इक्रिसॅटचे महासंचालक डॉ. पीटर कार्बेरी व ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्यात झालेला सामंजस्य करार हा कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान व जिरायती भागासाठी नवे वाण, संशोधित वाण, पाण्याचा ताण सहन करणारे बियाणे याबरोबरच शेतकरी, विद्यार्थी यांच्यातील प्रशिक्षणाचा आहे. दुसरा करार फिनिक्स या करार शेती कंपनीचे गौरव धवन यांच्यासमवेत झाला. यामध्ये शेतकऱ्यांबरोबर करार शेती करण्याबरोबरच रोगमुक्त भाजीपाला रोपांचे उत्पादन व तंत्रज्ञानाचा पुरवठा, भाजीपाला उत्पादन, प्रक्रिया ते निर्यातीपर्यंतच्या सामंजस्य सहकार्याचा यामध्ये समावेश आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठासमवेतही करार झाला. विद्यापीठाचे संचालक डॉ. फरांदे व राजेंद्र पवार यांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या. विद्यापीठाने एमएस्सी व पीएचडीच्या विद्यार्थ्यांना भाजीपाला उच्च गुणवत्तेच्या उत्पादनाबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी सहकार्याचा हा करार आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळानेही अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टशी करार केला. महाव्यवस्थापक डॉ. अरीज अहमद व राजेंद्र पवार यांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या. यामध्ये देशाच्या ग्रामीण भागातील युवा शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादनाबाबत प्रवीण करणे, त्यांना प्रशिक्षित करणे व रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचा यामध्ये समावेश आहे.  या व्यतिरिक्त अटारीचे संचालक डॉ. लाखनसिंग व राजेंद्र पवार यांनी स्वाक्षरी केलेल्या करारामध्ये पिकांमधील अजैविक ताण निवारणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करणे, शेतकरी व विद्यार्थ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे याचा समावेश आहे. 

सहावा करार हा बायर या औषधनिर्मिती कंपनीसोबत झाला. या कंपनीच्या सीएसआर विभागाचे प्रमुख सुहास जोशी व ट्रस्टचे विश्वस्त विष्णूपंत हिंगणे यांनी इन्क्युबेशन सेंटरसाठी मदतीचा करार केला.

बारामतीत अॅग्रीकल्चरल रिसर्च अॅण्ड इनोव्हेशन सेंटर शारदानगर येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये ट्रस्ट आणि विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना नवसंशोधनाला पाठबळ मिळण्यासाठी तब्बल १५० कोटींचे अॅग्रीकल्चरल रिसर्च अॅँड इनोव्हेशन सेंटर उभारले जाणार आहे, अर्थात एवढ्या मोठ्या खर्चापैकी १२५ कोटींचा खर्चाचा भार सिंगापूर येथील टाटा टेक्नॉलॉजी उचलणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT