Sin in cotton measurements
Sin in cotton measurements 
मुख्य बातम्या

कापूस मोजमापात पाप

टीम अॅग्रोवन

वाशीम : शेतकऱ्यांना लुबाडणारी एक व्यवस्थाच तयार झाली आहे. जिथे संधी मिळेल तेथे लुटले जाते. वाशीम जिल्ह्यात कापसाची खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी वजनकाट्यात हेराफेरी करून अनेकांची फसवणूक केली आहे. या टोळीचा जिल्ह्यातील मालेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. हे व्यापारी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे रिमोटच्या साह्याने चालवत कापसाचे वजन कमी दाखवत होते. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी गुरुवारी (ता. २०) दिली.

मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे बुधवारी (ता. १९) प्रवीण देविदास सोलनोर यांच्याकडे कापूस खरेदी करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील काही व्यापारी आले होते. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर कापसाचे वजन सुरू असताना त्यातील काही जण प्रवीण यांना वारंवार घरामधून पिण्यासाठी पाणी आणायला सांगत होते. ही बाब प्रवीण यांना खटकली. तसेच कापूस मोजमाप करीत असलेल्यांपैकी एकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे या वेळी त्याची झाडाझडती घेतली असता खिशात रिमोट आढळून आले. तेव्हा आपली फसगत होत असल्याची त्यांची खात्री पटली. प्रवीण सोलनोर यांनी या बाबत मालेगाव पोलिसांत तक्रार दिली. 

पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोहम्मद मोसिन मोहम्मद हुसेन, शेख अनिस शेख युसूफ, शकील ऊर्फ छोटू हुसेन शहा, मखसुद खान महमूद खान, शहबाज खान इजाज खान, शहजाद खान महमूद खान, आशिक खान जफोरउल्ला खान (सर्व रा. बार्शीटाकळी, जि. अकोला) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करीत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्वांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

आणखी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचीही शक्यता कापसाची बाजारपेठ तेजीत असल्याने खेडा खरेदीला जोर आला आहे. व्यापारी खेडा खरेदीत बाजारपेठांच्या तुलनेत थोडा कमी दर देऊन खरेदी करतात. वाहतूक खर्च व इतर बाबींचा त्रास कमी होत असल्याने शेतकरीसुद्धा खेडा खरेदीत कापूस विक्री करतात. मात्र चलाख व्यापारी आता वजन काट्यात शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. रिमोट कंट्रोलचा वापर सुरू केला आहे. बार्शीटाकळीच्या टोळीने यापूर्वी हंगामात किती शेतकऱ्यांकडून खरेदी केली, याची चौकशी झाली तर फसवलेल्यांची माहिती आणखी समोर येऊ शकेल.

शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विकताना इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन व्यवस्थित होत आहे किंवा नाही, या बाबत खात्री करून शेतीमाल विक्री करावी. - बच्चन सिंग, पोलिस अधीक्षक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

SCROLL FOR NEXT