रेशीम कोष
रेशीम कोष  
मुख्य बातम्या

जालन्यातील रेशीम कोष खरेदी थांबली

टीम अॅग्रोवन

जालना : येथील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारातील कोष खरेदी थांबली आहे. व्यापारी नसण्यासोबतच बहुतांश रेशीम कोष उत्पादकांनी वाढलेले तापमान, पाणीटंचाई यामुळे कोष उत्पादनाला ब्रेक दिल्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसतो आहे. व्यापारी कसे येतील यासाठी प्रयत्न सुरू असताना उत्पादकांची गैरसोय होऊ नये म्हणून संपर्क करणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापारी उपलब्ध होतील तसे कळिवले जाईल व त्यानुसार कोष बाजारात घेऊन येण्याचे सांगितले जात असल्याची माहिती बाजारपेठेतील सूत्रांनी दिली.  जालना बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ शनिवारी (ता. २१) प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी दोन हजार दोन किलो रेशीम कोषाची खरेदी करण्यात आली. या कोषाला २०० ते ४७५ रुपये प्रतिकिलोपर्यंतचा दर मिळाला. उद्‌घाटनाला कर्नाटकासह मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील जवळपास चौदा व्यापाऱ्यांनी कोषाच्या खरेदीसाठी हजेरी लावली. प्रत्यक्षात केवळ सहा व्यापाऱ्यांनी खरेदीच्या एकूण प्रक्रियेत सहभाग नोंदविला. पहिल्या दिवशी कोष खरेदी झाल्यानंतर बाजारपेठ सुरू राहिले, असे वाटत असतानाच व्यापारी खरेदीसाठी आले नाही.  दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील रिलिंग युनिटसाठी लागणारा कोष उपलब्ध असल्याने त्यांना किमान आठवडाभर कोषाची गरज पडणार नाही तर जालन्यातील रिलिंग युनिट अजून सुरू झाले नसल्याची माहिती बाजारपेठेतील सूत्रांनी दिली. त्यामुळे कोष खरेदीसाठी व्यापारीच नसल्याने बाजारपेठेत रेशीम कोष खरेदीला ब्रेक लागला आहे. मराठवाड्यात एप्रिल, मे व जून महिन्यात पाण्याची कमतरता, वाढते तपामान आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात कोष उत्पादन घेणे थांबवितात. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर होत असल्याचे दिसते. व्यापारी जसे उपलब्ध होतील तसे कोष उत्पादक शेतकऱ्यांना कळवून कोषाची खरेदी सुरू केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  जालना बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीचे साहित्य उपलब्ध असल्याने त्याचा या खरेदी प्रक्रियेत उपयोग करून घेता येईल का याविषयीही चाचपणी केली जात आहे. उन्हाळ्यात कोषाचा दर्जा व उत्पादन अपेक्षित नसणे व त्यामुळे व्यापाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात दर्जेदार माल एकाच ठिकाणावरून न मिळणे, शिवाय कर्नाटकातील निवडणुकाही व्यापाऱ्यांच्या येण्यात अडथळा आणत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  पाच कर्मचारी कार्यरत रेशीम विभागाकडून चार व बाजार समितीचा एक असे पाच कर्मचारी प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम बाजारपेठ सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नियुक्‍त करण्यात आले आहे. त्यामध्ये रेशीम विभागाकडून देण्यात आलेले दोन वरिष्ठ तांत्रिक सहायक, एक ज्येष्ठ क्षेत्र सहायक, एक शिपायाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT