silk
silk  
मुख्य बातम्या

जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६ लाखांवर 

टीम अॅग्रोवन

जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या हंगामातील उलाढाल ६६ लाखांवर पोहोचली आहे. आत्तापर्यंत जवळपास ३७ टन रेशीम कोषाची आवक बाजारात झाल्याची माहिती रेशीम कोष खरेदी करणाऱ्या यंत्रणेच्यावतीने देण्यात आली. जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची सुरुवात करण्यात आली. गत आर्थिक वर्षात जालना रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत जवळपास ३१८ टन रेशीम कोषांची आवक झाली होती. तर प्रति किलो १५० रुपयांपासून ५५० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अडचणी आल्या. जवळपास २१ जुलैपासून यंदाच्या हंगामाची खरेदी सुरू झाली. कोरोना संकटापूर्वी सामान्य स्थितीत जवळपास ४० ते ६० शेतकरी दर दिवशी ५ ते ६ टन कोष विक्रीसाठी आणायचे.  कोरोना संकटानंतर मात्र बाजार समितीने गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू केली. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना गर्दी टाळून खरेदीसाठी बोलावण्याचा नियम लागू केला. दरदिवशी केवळ ३० शेतकऱ्यांना खरेदीसाठी पाचारण केले जाते आहे. आत्तापर्यंत जवळपास ८०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून त्यापैकी जवळपास ४०० शेतकऱ्यांकडील रेशीम कोषांची खरेदी करण्यात आली आहे.  बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी कोष खरेदी कोरोना संकटातही शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नियमांचे पालन करून खबरदारी घेत सुरू राहील याची विशेष दक्षता घेतल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात आले. जालना येथील दोन व बीड जिल्ह्यातील तीन असे एकूण पाच व्यापारी  दररोज सकाळी ११:३० वाजता  होणाऱ्या  रेशीम कोष लिलावात  सहभागी होत असल्याचे रेशीम कोष खरेदी करणाऱ्या यंत्रणेच्यावतीने सांगण्यात आले.

दरात घसरण कोरोना संकटापूर्वी दिवसाला सहा टनापर्यंत पोहोचलेली रेशीम कोषाची आवक आज घडीला तीन ते चार टनांवर आली आहे. तर १२० ते २२० रुपये प्रतिकिलोपर्यंत रेशीम कोषांना दर मिळत आहेत. गेल्यावर्षी प्रतिकिलो १५० ते ५५० रुपयांपर्यंत दर मिळाला होता.

प्रतिक्रिया कोरोना संकट पाहता रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेतो आहोत. आधी ऑनलाइन नोंदणी व नंतर दिवसाला ३० शेतकऱ्यांना बोलावून कोष खरेदी केली जाते. - रजनीकांत इंगळे, सचिव, बाजार समिती जालना.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT