Shrimp production should be increased: Chandrikapure 
मुख्य बातम्या

‘झिंगा’ उत्पादन वाढवावे ः आमदार चंद्रिकापुरे

मत्स्य व्यवसाय संस्थांनी आर्थिक बळकटीसाठी ‘झिंगा’ उत्पादन वाढविणे काळाची गरज आहे, असे मत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.

टीम अॅग्रोवन

सडक अर्जुनी, जि. गोंदिया ः मत्स्य व्यवसाय संस्थांनी आर्थिक बळकटीसाठी ‘झिंगा’ उत्पादन वाढविणे काळाची गरज आहे, असे मत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. 

अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना आधुनिक पद्धतीने गोड्या पाण्यातील झिंगा (कोळंबी) संवर्धनाचे पथदर्शी प्रकल्पाबाबत अर्जुनी मोर व सडक अर्जुनी येथील सहकारी संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांची सभा आमदार मनोहर चंद्रिकापुरे अध्यक्षतेखाली कोहमारा येथील जनसंपर्क कार्यालयात सभा घेण्यात आली. या प्रसंगी ते बोलत होते. 

सभेला मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त स. ज. परवेज, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी चित्रांगणा सलामे, सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी शशांक शहारे खासगी क्षेत्रातील झिंगा तज्ज्ञ लुनेश जाधव, प्रादेशिक व्यवस्थापक डॉ. अजय, तांत्रिक व्यवस्थापक कुणाल खोडे, झिंगा उत्पादन कंपनी रायपूर उपस्थित होते. 

आमदार चंद्रिकापुरे यांनी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था स्वतंत्ररीत्या भांडवल उभे करून किंवा कर्ज घेऊन झिंगा उत्पादन प्रकल्प करणे जिकरीचे ठरणार असल्याने संस्थांचे महासंघ स्थापन करून त्यामार्फत झिंगा उत्पादनाचे प्रकल्प तयार करण्याचा सल्ला दिला. त्याआधारे राज्य शासनाची सबसिडी मिळणाऱ्या योजनेत समावेश करून संस्थांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्‍तींना तलावाच्या ठिकाणी भेट देऊन प्रकल्प तयार करण्याबाबत संस्थांना मदत करण्यात येईल, असे आश्‍वासित केले. 

या वेळी बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एफ.आर.टी. शहा यांनी केले. उमराव माढरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सडक अर्जुनी व मोर अर्जुनी तालुक्‍यातील पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT