Short response to Tur registration at shopping centers 
मुख्य बातम्या

लातूरमध्ये खरेदी केंद्रांवर तूर नोंदणीला अल्प प्रतिसाद

लातूर : जिल्ह्यात हमीदराने तूर खरेदीसाठी नोंदणीला नगण्य का होईना प्रतिसाद मिळाला. मात्र, मका, सोयाबीन, बाजरी आदी शेतमालाच्या नोंदणीला प्रतिसादच मिळाला नसल्याचे चित्र आहे.

टीम अॅग्रोवन

लातूर : जिल्ह्यात हमीदराने तूर खरेदीसाठी नोंदणीला नगण्य का होईना प्रतिसाद मिळाला. मात्र, मका, सोयाबीन, बाजरी आदी शेतमालाच्या नोंदणीला प्रतिसादच मिळाला नसल्याचे चित्र आहे.

बाजारात हमीदरापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी केला जावू नये, या साठीचा हस्तक्षेप म्हणून शासनातर्फे हमीदराने शेतमाल खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. लातूर जिल्ह्यातही मका, सोयाबीन, बाजरी यासह तुरीची किमान आधारभूत किमतीने खरेदी केली जावी म्हणून शासनाच्या वतीने मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. परंतु, बाजारात हमीदरापेक्षा जास्तीचे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी बाजरी, मका, सोयाबीनच्या नोंदणीला प्रतिसादच दिला नाही.

लातूर जिल्ह्यात तूर खरेदीसाठी ११ केंद्रे सुरू करण्यात आली. त्यामध्ये अहमदपूर, हलसी, औसा, भोपणी, चाकूर, देवणी, लातूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, शिंदगी, उदगीर येथील केंद्रांचा समावेश आहे. या सर्व ११ केंद्रांवर आतापर्यंत २४६ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये औसा येथील केंद्रात सर्वाधिक ६३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. चाकूर येथे ५२, रेणापूर ३५, भोपणी ३३, लातूर २४, हलसी २०, अहमदपूर येथून ९, शिंदगी ५, देवणी व उदगीर येथील केंद्रात प्रत्येकी २, तर शिरूर अनंतपाळ येथील केंद्रात एक शेतकऱ्याने नोंदणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Declaration : दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढण्याची शक्यता

Maharashtra Drought 2026: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ

Agrowon Sarpanch Mahaparishad: कोल्हापुरात आज विभागीय ‘ॲग्रोवन सरपंच महापरिषद’

Sugar Prices Issue: साखरेच्या दराबाबत सरकार गंभीर नाही: आमदार जयंत पाटील

Maharashtra Rain Prediction: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT