sheep  
मुख्य बातम्या

लॉकडाउनमुळे भासतेय मेंढ्यांना चाऱ्याची टंचाई 

लॉकडाउनमुळे मेंढपाळ बांधवांपुढे मेंढ्यांच्या पालनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. स्थलांतरित स्वरूपात मेंढ्यांच्या चारापाण्यासाठी जावे लागत असते. मात्र लॉकडाउनमूळे वाडे गावशिवारातच फिरावे लागत असल्याने सध्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे.

टीम अॅग्रोवन

वडेल, जि. नाशिक : लॉकडाउनमुळे मेंढपाळ बांधवांपुढे मेंढ्यांच्या पालनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. स्थलांतरित स्वरूपात मेंढ्यांच्या चारापाण्यासाठी जावे लागत असते. मात्र लॉकडाउनमूळे वाडे गावशिवारातच फिरावे लागत असल्याने सध्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. 

कोरोना लॉकडाउन अनेक ठिकाणी गावबंदी असल्यामुळे भटकंती करणाऱ्या मेंढपाळ बांधवांची कोंडी झाली आहे. अनेक ठिकाणी गावातील घरे सोडून ग्रामस्थ शेतात स्थलांतरित झाल्याने बाहेरगावच्या मेंढपाळांना मळ्यामध्ये मेंढ्या बसविण्यास शेतीमालकांकडून नकार मिळत आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भटकंतीवर राहणाऱ्‍या मेंढपाळ समाजानेही बाहेरगावी वाडे नेण्याऐवजी गावशिवारातच चराई करण्यासाठी पसंती दिली आहे. मात्र ज्या गावांत पाण्याचे दुर्भीक्ष आहे, तेथे मेंढ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. दसऱ्यानंतर आपापले वाडे घेऊन भटकंतीवर निघणारे मेंढपाळ यंदा मात्र गावशिवारातच बंदिस्त झाले आहेत. मेंढ्यांचे पालनपोषण आजवर गाव परिसरात असलेल्या चाऱ्‍यावर होत होते. मात्र आता गावशिवारातील चाराही संपुष्टात आल्याने तसेच कोरोनामुळे गावाबाहेर निघता येत नसल्याने मेंढीपालनाचा व्यवसाय चिंतेचा विषय ठरत आहे. 

मालेगाव तालुक्यातील अजंग, कजवाडे, निमशेवडी, रामपुरा, कंक्राळे आदी गावांतील मेंढपाळ दर वर्षी परजिल्ह्यांमध्येही आपापले वाडे (तळ) घेऊन भटकंती करत असतात. मात्र, यंदा बाहेरगावी हे वाडे स्थलांतरित होऊ न शकल्याने मेंढपाळ बांधवांसमोर निदान पावसाळा येईपर्यंत तरी मेंढ्यांचे पालनपोषण करण्याचा मोठा प्रश्‍न आहे.  प्रतिक्रिया  गावोगावी कोरोनाच्या भयानक साथीमुळे वेगवेगळ्या गावी भटकंती करून मेंढ्या जगविणारा मेंढपाळ समाज सध्या स्वत:च्या गावशिवारातच बंदिस्त झाला आहे. त्यामुळे मेंढ्यांचे पालन पोषण कसे होईल, ही चिंता त्यांना भेडसावत आहे.  - वसंत हळनर, मेंढपाळ, रामपुरा, ता. मालेगाव  दरवर्षी गावोगावी भटकंती करून मेंढ्यांचे पालनपोषण करणाऱ्या समाजापुढे यंदा कोरोना महामारीमुळे भटकंतीचा प्रश्‍न उभा राहिला आहे.  - उमेश हळनर, मेंढपाळ, रामपुरा, ता. मालेगाव 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT