Of seedlings, cuttings, seeds Need for supply time: Dr. Dhawan 
मुख्य बातम्या

रोपांचा, कलमांचा, बियाण्यांचा पुरवठा काळाची गरज ः डॉ. ढवण

जालना : ‘‘फळझाडांची यशस्वी लागवड करण्यासाठी रोपवाटिकेतून चांगल्या जातिवंत रोपांचा, कलमांचा आणि बियाण्यांचा पुरवठा झाला पाहिजे. मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मागणी नोंदवितो. तेव्हा मागणीनुसार पुरवठा करणे ही काळाची गरज आहे,’’ असेही प्रतिपादन ‘वनामकृवी’चे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

टीम अॅग्रोवन

जालना : ‘‘फळझाडांची यशस्वी लागवड करण्यासाठी रोपवाटिकेतून चांगल्या जातिवंत रोपांचा, कलमांचा आणि बियाण्यांचा पुरवठा झाला पाहिजे. मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मागणी नोंदवितो. तेव्हा मागणीनुसार पुरवठा करणे ही काळाची गरज आहे,’’ असेही प्रतिपादन ‘वनामकृवी’चे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बदनापूर आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीअंतर्गत केंद्रीय लिंबू वर्गीय फळपिके संशोधन संस्था, नागपूरतर्फे ऑनलाइन प्रणालीचा वापर करून तीन दिवसीय मोसंबी पीक लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. केंद्रीय लिंबू वर्गीय फळपिके संशोधन संस्थेचे  संचालक डॉ. दिलीप घोष, अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. देवसरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. 

डॉ. देवसरकर म्हणाले, ‘‘मागील काही दिवसांपासून शेतकरी बांधवांची सदरील प्रशिक्षणा बाबत मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती. त्यामुळे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.’’

डॉ. घोष म्हणाले, ‘‘मराठवाड्यात फळबाग लागवडीद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. लघु उद्योग आधारित लिंबू वर्गीय फळ पिकांवर प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर उभारणी करणे गरजेचे आहे. ज्यामुळे शेती सोबतच अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते.’’

डॉ. सिंग म्हणाले, सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून युवकांना आकर्षित करणे गरजेचे आहे. सोबतच सगळ्या संशोधन संस्थानी त्यांचे अद्ययावत नवनवीन तंत्रज्ञान विस्तार अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत अधिकाधिक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कसे पोचविता येईल, हे पाहायला हवे.’’

डॉ. आर. एल. कदम यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. डी. बी. कच्छवे, विषय विशेषज्ञ (उद्यान विद्या) यांनी सर्वांचे आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ९.३२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८,६४० कोटी जमा

Banana Farming: आगाप केळी लागवडीवेळी घ्यावयाची काळजी

Agriculture Event: नांदेडला सोमवारी खरेदीदार-विक्रेता संमेलन

E-Sakal: मराठी डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळ अव्वल; कॉमस्कोर रँकिंगमध्ये पहिला क्रमांक

Agrowon Podcast: सोयाबीनचा भाव टिकून; कापसावर दबाव कायम, भेंडी- आल्याचे दर टिकून तर कोथिंबीरला उठाव

SCROLL FOR NEXT