बुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज प्रक्रिया, आधुनिक शेतीचे धडे 
मुख्य बातम्या

बुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज प्रक्रिया, आधुनिक शेतीचे धडे

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सामूहिक फळप्रक्रिया व संस्करण प्रशिक्षण केंद्र (औरंगाबाद) आणि विवेकानंद प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मेहकर येथे बुधवारी (ता. १२) फळप्रक्रिया व संस्करण महिला शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.  या प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी उपसभापती लीलाताई लेकुरवाळे होत्या. उद्‍घाटक म्हणून मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर होते. राजू पळसकर, निंबाजी पांडव, जितेंद्र चिंतलवाड, श्री. सुरजुशे, दिनेश गिरी, राजेंद्र यादव व विठ्ठल धांडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणामध्ये श्री. यादव यांनी महिला शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायास उपयुक्त असे विविध घरगुती पदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखवले.   श्री. धांडे यांनी महिलांना खरीप हंगामपूर्व तयारी करताना घरच्या घरी सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासणे, बीज प्रक्रिया व खतातील भेसळ कशी ओळखावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.  सोयाबीन पिकाचे हंगाम तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक भारत कापसे यांनी शेतकरी गटाविषयी, पुरुषोत्तम भराड यांनी महिला बचत गटांना शेतीपूरक व्यवसाय, प्रकल्प आराखडा तयार करणे व बँकेमार्फत कर्जव्यवस्था याबाबत मार्गदर्शन केले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan Subsidy: व्याज सवलत ‘डीबीटी’द्वारे

Land Surveyor Exam: भूकरमापक भरती प्रक्रियेमधील संभ्रम मिटला

Quaternary Science: पृथ्वी विज्ञानात संशोधनाची गरज

Toll Plaza Dispute: स्थानिकांना विश्‍वासात घेऊनच तक्रारवाडीत टोलनाका सुरू करा

Pomegranate Market: डाळिंब उत्पादकांना शेवटच्या टप्प्यात दराने तारले

SCROLL FOR NEXT