हंगाम जोरावर, मजूर मिळेनात The season is in full swing, labor is not available
हंगाम जोरावर, मजूर मिळेनात The season is in full swing, labor is not available 
मुख्य बातम्या

हंगाम जोरावर, मजूर मिळेनात

टीम अॅग्रोवन

नांदुरा, जि. बुलडाणा : तालुक्यातील सध्या सोयाबीन सोंगणी व कापूस वेचणीसाठी मजूर न मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहले आहे. मजूर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ होत आहे. मागील गत आठवड्यापासून तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्याने सोयाबीन काढणी तसेच कापूस वेचणीची लगबग सुरू झाली आहे. सोयाबीन सोंगणीसाठी तीन ते साडेतीन हजार रुपये एकरी दर द्यावा लागत आहे. तर कापूस वेचणीसाठी १० ते १२ रुपये किलो प्रति किलोचा भाव देऊनही मजूर मिळेनासे झालेले आहेत. अशी परिस्थिती तालुक्यातील अनेक गावांत निर्माण झाली आहे. काही शेतकरी तर गावात मजूर मिळत नसल्याने अन्य गावांतून मजूर आणून सोयाबीनची सोंगणी करून घेत आहेत. बाहेर गावावरून मजूर आणताना त्यांच्या जाण्या-येण्यासाठी लागणाऱ्या वाहनाची व्यवस्था व त्याचा खर्च शेतकऱ्याला करावा लागत आहे. ऑगस्टमध्ये पडलेला पाऊस व सप्टेंबर महिन्यात काही दिवस झालेली अतिवृष्टी यामुळे सोयाबीन शेंगाना कोंब फुटले तर काही शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलेल्या सोयाबीन खराब झाली. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून, एकरी ७ ते ८ पोते उत्पादन होईल, अशी आशा बाळगून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. अपेक्षेपेक्षा अर्धे उत्पादन झाले आहे. उडीद व मुगाला पावसाचा फटका बसला होता. सोयाबीन सोंगण्याचे दर वाढल्याने मजूर जरी आनंदीत असला तरी मिळणाऱ्या उत्पादनातून व सोंगणीसाठी मोजाव्या लागणाऱ्या रकमेबाबत शेतकरी समाधानी नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आधीच शेतकरी पिकांचे नुकसान झाल्याने अडचणीत सापडलेला आहे. पीक विमा काढलेल्या तसेच ज्यांनी काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांनाही सरसकट भरपाईची मागणी शेतकरी करीत आहेत.

खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी कापसाची खरेदी करणारे व्यापारी हे शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाऊन ६ ते ७ हजार रुपये भाव देत आहेत. तर दुसरीकडे वेचणीसाठी १० ते १५ रुपये किलोला भाव द्यावा लागत आहे. क्विंटलला हजार ते दीड हजारांचा खर्च होत आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत वेचाईचा खर्च अव्वाच्या सव्वा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT