तज्ज्ञ बांधावर
तज्ज्ञ बांधावर 
मुख्य बातम्या

आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर

टीम अॅग्रोवन

जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांनी थेट बांधावर जाऊन आंबा मोहर संरक्षणाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यासाठी आंबा मोहर संरक्षण अभियानही सुरू करण्यात आल्याची माहिती शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली.  जाफराबाद तालुक्‍यातील नळविहिरा, टेंभूर्णी परिसरातील आंबा बागांची पाहणी करून बागांचे व्यवस्थापन व येत असलेल्या संकटांची माहितीही या वेळी तज्ज्ञांनी घेतली. औरंगाबादच्या केसर आंबा गुणवत्ता केंद्रातर्फे आंबा मोहर संरक्षण अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत गत पंधरवड्यात उस्मानाबादमधील तेरखेडा, जालन्यातील अंबड, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, कन्नड तालुक्‍यातील आंबा उत्पादकांशी फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी आंबा उत्पादकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान पुनर्मोहरावरील उपाययोजना, खोडकिडा काढूण प्रतिबंधात्मक उपाय याविषयीचे प्रात्यक्षीक, अजैविक ताणामुळे झाडांची पाने करपतात याविषयी, फळधारणेच्या अवस्थेतील आंबा बागांना अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे उपाय, डॉ. एम. बी. पाटील व आपण स्वत: शेतकऱ्यांना माहिती दिल्याचे डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.  आंबा मोहर संरक्षण अभियानाच्या प्रसंगी टेंभुर्णी, नळविहिरा (ता जाफराबाद) येथील आंबा बागांना १३ फेब्रुवारीला डॉ. संजय पाटील यांनी भेट दिली. फळगळ टाळण्यासाठी व फळांच्या वाढीसाठी ठिबक संच रात्रीच्या वेळी चालविल्यास थंडीपासून बचाव होऊन बागेतील तापमान वाढविण्यास मदत होते, असे डॉ. पाटील यांनी शेतकऱ्यांना सांगितले. या वेळी आंबा उत्पादक शेतकरी गजेंद्र खोत, शंकर खोत, कृषिभूषण संजय मोरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे तांत्रिक उत्तरे देऊन डॉ पाटील यांनी निरसन केले. गुुणवत्ता केंद्राने प्रत्यक्ष शेतावर येऊन मार्गदर्शन केल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊन चार पैसे हाती मिळतील असे शेतकरी गजेंद्र खोत म्हणाले. या परिसरात सातत्याने गुणवत्ता केंद्राने मार्गदर्शनाची अपेक्षा संजय मोरे यांनी व्यक्त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT