निर्यातक्षम केळी
निर्यातक्षम केळी  
मुख्य बातम्या

निर्यातक्षम केळीचा देशभरात जाणवतोय मोठा तुटवडा

Chandrakant Jadhav

जळगाव ः केळीचे आगार म्हणून देशभर ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यातून केळीची परदेशातील निर्यात बंद झाली आहे. राज्यातून मार्च २०१९ ते जून या दरम्यान १३०० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात आखातात झाली आहे. यात एकट्या जळगाव जिल्ह्याचा वाटा सुमारे ७५० कंटेनर एवढा आहे.  जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर व यावल या भागांतून मार्च ते जूनदरम्यान केळीची निर्यात सुरू होती. जूननंतर निर्यातदार कंपन्यांनी कार्यवाही बंद केली. निर्यातीच्या केळीला १२०० व कमाल १६०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. मागील वर्षाच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यातील निर्यात ३०० कंटेनरने वाढली आहे. तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथून २७५ कंटेनर केळी निर्यात झाली.  रावेर, मुक्ताईनगर, यावलसह नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात निर्यातक्षम केळीची काढणी पूर्ण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात पुढे मार्चमध्ये निर्यातक्षम केळी काढणीसाठी उपलब्ध होईल. यातच सध्या देशभरात निर्यातक्षम केळीचा तुटवडा आहे. फक्त तमीळनाडूनमधील थेणी येथून प्रतिदिन नऊ कंटेनरची निर्यात परदेशात सध्या सुरू आहे. आंध्र प्रदेशातील केळीची निर्यात जानेवारी, २०१९ मध्येच बंद झाली होती. तेथून जानेवारीतच निर्यातक्षम केळी काढणीसाठी उपलब्ध होईल. राज्यात सध्या फक्त अकलूज (जि. सोलापूर) येथून केळीची परदेशात निर्यात होत असून, प्रतिदिन सरासरी तीन कंटेनरची पाठवणूक तेथून तीन निर्यातदार कंपन्यांच्या माध्यमातून होत आहे.  गुजरातमधील कामरेज येथूनही केळीची अल्प निर्यात सुरू असून, प्रतिदिन एक कंटेनरची पाठवणूक तेथून आखातात सुरू आहे. तर मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात केळी काढणीसाठी उपलब्ध असली तरी तेथे निर्यातक्षम केळी उपलब्ध होत नसल्याची माहिती जाणकारांनी दिली. देशातून सध्या प्रतिदिन सुमारे १४ कंटेनर केळीची निर्यात परदेशात होत आहे. निर्यातक्षम केळीचा तुटवडा असल्याने निर्यातीच्या केळीचे दर महिनाभरात वधारून १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

SCROLL FOR NEXT