Scan the QR code, get crop information 
मुख्य बातम्या

क्यूआर कोड स्कॅन करा, पिकांची माहिती मिळवा

सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राने विस्तारकार्यात डिजिटलायझेशनचा वापर करत शेतकऱ्यांना पिकांची माहिती त्यांच्या मोबाईलवर सहजासहजी उपलब्ध व्हावी, यासाठी क्यूआर कोडची संकल्पना मांडली आहे.

Sudarshan Sutaar

सोलापूर ः सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राने विस्तारकार्यात डिजिटलायझेशनचा वापर करत शेतकऱ्यांना पिकांची माहिती त्यांच्या मोबाईलवर सहजासहजी उपलब्ध व्हावी, यासाठी क्यूआर कोडची संकल्पना मांडली आहे. या माध्यमातून विविध फळांसह भाजीपाल्याची लागवड ते काढणी आणि विक्रीपर्यंतची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर संबंधित पिकाचा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत उपलब्ध होते आहे.  

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डाॅ. लालासाहेब तांबडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. कृषी विज्ञान केंद्राने जिल्ह्यातील दत्तक घेतलेल्या ७० गावांतील शेतकरी सध्या या सुविधेचा लाभ घेत आहेत. त्यासाठी संबंधित पिकांची माहिती असणारे क्यूआर कोडचे खास डिजिटल पोस्टर तयार केले आहे. त्यावर संबंधित पिकांचे नाव, त्याचे छायाचित्र आणि खाली कोड आहे. आपल्याला हवा तो कोड मोबाईलवर स्कॅन केला की तत्काळ त्याची माहिती उपलब्ध होते. पूर्वी कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना विविध पिकांच्या माहितीसाठी घडीपुस्तिका, माहितीपत्रक पुरवल्या जात होत्या. पण आता थेट मोबाईलवरच ही सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे.

पिकांसह पूरक, प्रक्रिया उद्योगांची माहिती  या क्युआरकोडच्या माध्यमातून सिमला मिरची, कांदा, शेवगा, भेंडी या फळभाज्या, कलिगंड आणि खरबूज ही फळे तर सोयाबीन, तूर, हरभरा, मका या प्रमुख धान्य पिकांची माहिती उपलब्ध आहे. त्याशिवाय शेळीपालन, दुग्ध व्यवसाय या पूरक उद्योगासह ज्वारी आणि सोयाबीनच्या प्रक्रिया उद्योगाची माहितीचाही समावेश आहे. 

बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना सहजासहजी माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. यापुढेही त्याचा वापर अधिक वाढवणार आहोत.  - डाॅ. लालासाहेब तांबडे, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर 

आम्ही तज्ज्ञ आणि अनुभवी शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार केली आहे. त्यांचे मार्गदर्शन अन्य शेतकऱ्यांना देतो आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण या माध्यमातून चांगल्याप्रकारे होते.  - रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Market Update : अहिल्यानगरच्या बाजारपेठेत तेजी! रताळे, बटाट्यासह पालेभाज्यांना ग्राहकांची मोठी मागणी

Cattle Fodder Camps : पशुधनाचा जीव टांगणीला! चारा छावण्यांबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा; बाळासाहेब थोरातांची मागणी

Fodder Management : दुष्काळाचे संकट! पशुधनाला वाचवण्यासाठी करा चारा-पाण्याचे असे अचूक नियोजन

Latur Gaal Upsa Parvanagi: लातूरमध्ये गाळ उपशास ऑनलाइन परवानगी

Marigold Price Crash : सणासुदीला झेंडूच्या फुलांची मातीमोल विक्री; बाजारात शेतकऱ्यांच्या कष्टाची होतेय अवहेलना!

SCROLL FOR NEXT