स्वच्छ सर्वेक्षणात सातारा जिल्हा देशात सर्वोत्कृष्ट 
मुख्य बातम्या

स्वच्छ सर्वेक्षणात सातारा जिल्हा देशात सर्वोत्कृष्ट

टीम अॅग्रोवन

सातारा : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-२०१८’ स्पर्धेत राज्यातील सातारा जिल्ह्याने बाजी मारत देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सातारा जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक सभागृहात केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदे’चे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ‘स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण २०१८’ पुरस्काराचे वितरण झाले.

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेश, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती, केंद्रीय शहरी व गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पुरी, केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा आणि केंद्रीय पेयजल व स्वच्छता राज्य मंत्री रमेश जिगाजीनागी मंचावर उपस्थित होते. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल कार्यक्रमात सहभागी झाले. यासह कार्यक्रमास ६८ देशातील प्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण - ग्रामीण २०१८’  मोहिमेअंतर्गत दि. १ ते ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत देशभरातील सर्वच ७१८ जिल्ह्यांमध्ये स्वच्छतेच्या विविध निकषांवर सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यांतील निवडक गावे याप्रमाणे ६ हजार ९८० गावांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील ५४० गावांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात विविध मानकांमध्ये सरस ठरून सर्वाधिक गुण संपादन करणारा सातारा जिल्हा देशात प्रथम आला आहे.

पंतप्रधान यांच्या हस्ते सातारा जिल्ह्याला गौरविण्यात आले. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव विजयसिंग नाईक निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Disease : ‘लम्पी’ लसीकरण सुरू; तूर्त आजारी पशूंची नोंद नाही

Soybean Sowing : मराठवाड्यात २२ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी

Tree Plantation: कोटीच्या कोटी वृक्ष लागवड उद्दिष्टांची उड्डाणे?

Interview with Rajendra Jadhav: सोयाबीन, कापूस, तूर दबावात राहण्याची चिन्हे

Krishi Karma Vidya: एका ग्रंथाचा शोध आणि बोध

SCROLL FOR NEXT