लाळ्या खुरकूत लसीकरण, टॅगिंग करा Saliva scabies vaccination, tagging
लाळ्या खुरकूत लसीकरण, टॅगिंग करा Saliva scabies vaccination, tagging 
मुख्य बातम्या

नगर : लाळ्या खुरकूत लसीकरण, टॅगिंग करा 

टीम अॅग्रोवन

नगर : नगर जिल्ह्यातील सर्व जनावरांचे लाळ्या-खुरकूत लसीकरणासह टॅगिंग ३० दिवसांच्या आत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांना दिल्या.  नगर जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन, दुग्धशाळा समितीचे सभापती सुनील गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला सदस्य संध्या आठरे, सोनाली रोहमारे, शांता खैरे, दिनेश बर्डे, वंदना लोखंडे, ऊर्मिला राऊत, राजश्री मोरे, रावसाहेब कांगुणे, सुनीता दौंड यांच्यासह सचिव जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरुण हरिश्‍चंद्रे उपस्थित होते.  सभेमध्ये सुरुवातीला जिल्ह्यातील चालू असलेल्या लाळ्या-खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी पुढील नुकसान टाळण्यासाठी आपल्या जनावरांचे पशुवैद्यकामार्फत टॅगिंगसह लसीकरण करून घ्यावे. नगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांना ऊस वाहतुकीसाठी येणाऱ्या जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या जनावरांचे टॅगिंगसह लसीकरण करून घ्यावे, पशुसंवर्धन विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात आल्या. परंतु कोरोनामुळे जनावराचे बाजार बंद होते. त्यामुळे लाभार्थ्यांना दुभत्या जनावरांची गट/शेळ्या मेंढ्या त्यांचे गट/ एकदिवसीय पिलांचे कुक्कुट गट खरेदी करता आले नाहीत. या योजनांचा निधी पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात आला आहे, असे गडाख यांनी सांगितले.  विशेष घटक योजनेतून दुधाळ जनावराचे गट वाटपासाठी १ कोटी ४१ लाखांचा निधी मंजूर झालेला असून, त्यामध्ये एकूण २२१ लाभार्थी आहेत. शेळ्यांचे गट वाटप करण्यासाठी ४५ लाखांचा निधी मंजूर असून, त्यातून ८४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. पशुखाद्य वाटप योजनेसाठी दहा लाखांचा निधी मंजूर असून, त्यामध्ये ४०४ लाभार्थ्यांना निधी देण्यात येणार आहे.  आदिवासी उपयोजनेत दुधाळ जनावराचे गट वाटपामध्ये १२ लाखांचा निधी मंजूर असून, त्यातून १८ लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. शेळ्या-मेंढ्यांचे गट वाटप करण्यासाठी नऊ लाखांचा निधी मंजूर असून, ८६ लाभार्थी निवडण्यात येणार आहेत. एकदिवसीय कुक्कुट पिलांचे गट वाटपासाठी ५० लाखांचा निधी मंजूर असून, ६२५ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. पशुखाद्य वाटपासाठी अडीच लाखांचा निधी मंजूर झालेला असून, त्यामध्ये १०१ लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपाययोजनेतून दुधाळ जनावरांचे गट वाटपासाठी १२ लाखांचा निधी मंजूर असून, १८ लाभार्थींना लाभ होणार आहे. शेळ्या-मेंढ्यांचे गट वाटप करण्यासाठी नऊ लाखांचा निधी मंजूर असून, त्यातून १६ लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. एकदिवसीय कुक्कुट पिलांचे गट वाटपासाठी दहा लाखांचा निधी मंजूर असून, त्यातून १२५ लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. पशुखाद्याच्या वाटपासाठी दहा लाखांचा निधी मंजूर असून, त्यातून ४०४ जणांना लाभ होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

Loksabha Election : कसबा पॅटर्नची संधी साधणार की हुकणार

Water Scarcity : पुणे विभागात पाण्यासाठी वणवण

Cotton Production : भारत कापूस उत्पादनात पडतोय पिछाडीवर

SCROLL FOR NEXT