Saliva scabies vaccination in Parbhani cooled down 
मुख्य बातम्या

परभणीत लाळ्या खुरकूत लसीकरण थंडावले 

परभणी जिल्ह्यात लस मात्रा उपलब्ध न झाल्यामुळे जनावरांसाठी लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यास विलंब लागत आहे.

टीम अॅग्रोवन

परभणी ः जिल्ह्यात लस मात्रा उपलब्ध न झाल्यामुळे जनावरांसाठी लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यास विलंब लागत आहे. काही भागांत लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तत्काळ पुरेशा प्रमाणात लसपुरवठा करून लसीकरण मोहीम सुरू करावी, अशी मागणी जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे.  जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत मिळून ३ लाख ९८ हजार एवढ्या पशुधनास लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ४ लाखांवर लसीच्या मात्रांची मागणी केलेली आहे. परंतु अद्याप लसपुरवठा झालेला नाही. त्यामुळे लसीकरण मोहीम सुरू करता येत नाही. दर वर्षी साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ही मोहीम राबविली जाते. परंतु यंदा मागणी केलेल्या लसीच्या मात्रा अद्याप प्राप्त न झाल्यामुळे लसीकरण मोहीम सुरू करण्यास विलंब झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता.३०) लस मात्रा उपलब्ध होतील. त्यानंतर जिल्ह्यातील ७८ पशुचिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात येईल. या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना उपचारासाठी नजीकच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुचिकित्सालयाची संपर्क साधावा, असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी सांगितले. लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगाचा प्रसार रोखण्याठी पशुसंवर्धन विभागाने तत्काळ लसीकरण मोहीम सुरू करावी, अशी शेतकरी अशोक देशमुख यांनी केली आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: राज्यात वादळी पावसाचा अंदाज; पुढील ५ दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून काँग्रेसचे अनोखे आंदोलन

Biodegradable Packaging : जैवविघटनशील पॅकेजिंगचा वापर, फायदे

Moringa Processing : शेवगा पावडर, कॅप्सूल्स, अर्क निर्मिती तंत्र

Sugarcane Crushing Season: आधी उसाचा दर जाहीर करा, मग कारखाने सुरू करा, अन्यथा वाहतूक रोखू, 'आंदोलन अंकुश'चा इशारा

SCROLL FOR NEXT