एरंडोल, साक्री तालुक्यांत दुष्काळ
एरंडोल, साक्री तालुक्यांत दुष्काळ 
मुख्य बातम्या

एरंडोल, साक्री तालुक्यांत दुष्काळ

टीम अॅग्रोवन

जळगाव : संपूर्ण एरंडोल (जि. जळगाव) व साक्री (जि. धुळे) तालुक्‍यांत तातडीने दुष्काळ जाहीर करावा, दुष्काळासंबंधीच्या उपाययोजना, सवलती तातडीने लागू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी केली. यासंदर्भात संबंधित तालुक्‍यांमधील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 

एरंडोलमधील काही गावे अजूनही दुष्काळी जाहीर झालेली नाहीत. धरणगावमधील काही गावे दुष्काळी सवलतींपासून वगळली होती. परंतु या तालुक्‍यातही नवीन पैसेवारीनुसार दुष्काळ जाहीर झाला आहे. यामुळे जी गावे दुष्काळी सवलतींपासून वंचित आहेत, त्या भागात पुन्हा सर्वेक्षण करावे, त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

कांदा निर्यात सुरू करावी, कांदा विकलेल्या, या पिकापासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या लघु उद्योजकांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबिर घेऊन शेतकऱ्यांच्या मुलांना लघुउद्योग उभारणीसाठी त्वरित कर्ज मंजूर करावे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना संपूर्ण शिक्षण शुल्क माफ करावे, तालुक्‍यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT