महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर केशर लागवड 
मुख्य बातम्या

महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर केशर लागवड

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता स्ट्रॉबेरीबरोबर ‘केशर’ साठी सुद्धा ओळखले जावे याकरिता प्रयत्न सुरू झाले आहेत. कृषी विभागातर्फे राज्यातील केशर लागवडीचा पहिला प्रयोग महाबळेश्वर परिसरात राबवण्यात येत आहे.

मारुती कंदले

मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता स्ट्रॉबेरीबरोबर ‘केशर’ साठी सुद्धा ओळखले जावे याकरिता प्रयत्न सुरू झाले आहेत. कृषी विभागातर्फे राज्यातील केशर लागवडीचा पहिला प्रयोग महाबळेश्वर परिसरात राबवण्यात येत असून तो यशस्वी झाल्यास एक महत्त्वाचे पर्यायी पीक याभागातील शेतकऱ्यांनी उपलब्ध होईल. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. थंड वातावरणामुळे येथे दर्जेदार स्ट्रॉबेरी घेतली जाते. केशरकरिताही थंड वातावरणाची गरज असते, यामुळेच महाबळेश्‍वर परिसरात कृषी विभागातर्फे प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाबळेश्‍वर परिसरातील क्षेत्र महाबळेश्‍वर आणि मेत भुताड या दोन गावांमध्ये तीन शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. पावसामुळे लागवडीस उशीर झाला असला, तरी दोन महिन्यांपूर्वी येथे केशर लागवड करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच केशर लागवड करण्यात येत आहे. यापूर्वी काश्‍मिरातील सफरचंदाचा नाशिकला लागवडीचा यशस्वी प्रयोग शेतकऱ्याच्या पातळीवर करण्यात आला आहे.  महाबळेश्वरची ज्याप्रमाणे स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे तसेच ‘काश्मिरी केशर’ जगभरात उत्कृष्ट केशर म्हणून ओळखले जाते. या केशरचा भाव सुमारे साडेतीन लाख रुपये किलो असा आहे. काश्मीरमध्ये पंपोरे आणि किरतवाड या भागांमध्ये या केशराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. केशराच्या लागवडीसाठी विशिष्ट प्रकारचे हवामान, जमीन, प्रदेश उंची लागते. या उत्पादनासाठी लागणारे क्षेत्र हे समुद्रसपाटीपासून दोन ते अडीच हजार मीटर उंचीवरील असावे लागते. तेथील तापमान हे सरासरी 10 डिग्री सेल्सिअस असावे लागते. अशा ठिकाणी कंदाद्वारे एक फूट अंतरावर याची लागवड केली जाते. केशरच्या लागवडीला महाबळेश्वर तालुक्यातील वातावरण आणि जमीन योग्य आहे. कृषी सहाय्यक दीपक बोरूडे यांच्या प्रयत्नातून कृषी विभागाने काही शेतकऱ्यांच्या शेतात केशरची लागवड केली आहे. केशरची लागवड ऑगस्टनंतर केली जाते. मार्चमध्ये फुलांची काढणी केली जाते. नावीन्यपूर्ण बाब म्हणून महाबळेश्वर तालुक्यात केशरची लागवड केली आहे. महाबळेश्वर तालुका केशरसाठी ओळखला जावा आणि येथील शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळावे, म्हणून केशर लागवड केल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली. राज्याचा कृषी विभाग महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना येथील वातावरणाचा फायदा घेऊन नावीन्यपूर्ण शेती प्रयोग राबवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. येथील हवामान, जमीन हे केशरसाठी चांगले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास येथील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीबरोबर उत्पन्नाचा आणखी एक चांगला स्रोत उपलब्ध होणार आहे काश्मीरमधून आणले कंद... महाबळेश्वरमधील केशर लागवडीसाठी काश्मीर येथील किश्‍तवाड येथून कंद आणले आहेत. केशराचे हे कंद दोन हजार चारशे रुपये किलोप्रमाणे मिळतात. एक किलोमध्ये पस्तीस ते चाळीस कंद येतात. सध्या प्रायोगिक तत्त्वावर साडेतीनशे कंद मागविण्यात आले आहेत. 

प्रतिक्रिया.. नाविन्यपूर्ण बाब म्हणून महाबळेश्वर तालुक्यात केशरची लागवड केली आहे. महाबळेश्वर तालुका केशरसाठी ओळखला जावा आणि येथील शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळावे, म्हणून केशर लागवड केली आहे. कृषी सहायक दीपक बोर्डे यांची धडपड त्यामागे आहे. - विजयकुमार राऊत,   जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT