...अन् सचिनला भाषण करता आले नाही !
...अन् सचिनला भाषण करता आले नाही ! 
मुख्य बातम्या

...अन् सचिनला भाषण करता आले नाही !

वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून माफीनाम्याची मागणी करत काँग्रेसच्या खासदारांनी पुन्हा घातलेल्या गदारोळामुळे भारतरत्न सचिन तेंडुलकर याची राज्यसभेतील भाषणाची संधी हुकली. देशातील क्रीडा क्षेत्राविषयी महत्त्वाच्या आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मुद्यांवर सचिन संसदेत प्रथमच बोलणार होता. पण काँग्रेसच्या गदारोळामुळे त्याची ही संधी हिरावली गेली.  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा अपमान केला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. याबद्दल मोदी यांनी राज्यसभेत येऊन माफी मागितली पाहिजे, असा आग्रहही त्यांनी धरला आहे. यावरून शुक्रवारपासून काँग्रेसने राज्यसभेचे कामकाज होऊ दिलेले नाही. 

क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांवर लक्ष वेधण्यासाठी खासदार सचिन तेंडुलकरने वेळ मागितली होती. त्यानुसार, आज (गुरुवार) दुपारी दोनला त्याला बोलण्याची संधी मिळणार होती. त्यानुसार, सचिन बोलण्यासाठी उभा राहिल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी पुन्हा गदारोळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे निराश झालेला सचिन तब्बल ददा मिनिटे तसाच शांतपणे, एकही शब्द न उच्चारता जागेवर उभा राहिला. सभापती वेंकय्या नायडू यांनी काँग्रेसच्या खासदारांना वारंवार शांततेचे आवाहन केले. 'संपूर्ण देश तुमचे हे वर्तन पाहत आहे. शांत राहा आणि सचिनला बोलू द्या' असे आवाहन नायडू यांनी केले; पण त्याकडे साफ दुर्लक्ष करत काँग्रेसने गदारोळ सुरूच ठेवला. 

सचिन तेंडुलकरला राष्ट्रपतींनी खासदारपदी नियुक्त केले आहे. राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या खासदारांपैकी सचिनची कामगिरी चांगल्या वर्गात मोडते. खासदारांसाठी मिळणाऱ्या निधीपैकी 98 टक्के निधी खर्च केला आहे. सचिनने प्रस्ताव दिलेल्या प्रकल्पांपैकी 60 टक्‍क्‍यांहून अधिक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये दोन गावे दत्तक घेणाऱ्या मोजक्‍या खासदारांपैकी सचिन एक आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT