In the rocks of Karmala A leopard-like animal
In the rocks of Karmala A leopard-like animal 
मुख्य बातम्या

करमाळ्यातील खडकीत बिबट्यासदृष्य प्राण्याचा वावर

टीम अॅग्रोवन

करमाळा, जि. सोलापूर : खडकी (ता. करमाळा) गावाच्या परिसरात ग्रामस्थांनी बिबट्यासदृष्य प्राणी पाहिला आहे. सध्या करमाळा तालुक्‍याच्या शेजारील जामखेड भागात बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

खडकी येथील मुळे वस्तीवरील ग्रामस्थांनी सोमवारी (ता.३०) बिबट्या पाहिल्याने ग्रामस्थ दुपारपासून घरावर चढून बसले आहेत. प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित वन विभागामार्फत याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने घबराटीचे वातावरण आहे. 

बिबट्या सध्या करमाळा तालुक्‍याच्या शेजारी असलेल्या जामखेड तालुक्‍यात आला आहे. करमाळा तालुक्‍याच्या सीमेवर असलेल्या खडकी गावाच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे जामखेड भागातील बिबट्या करमाळ्यात शिरला असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या भागातील खडकी, कामोणे, जातेगांव, आळजापूर, मांगी, पोथरे भागातील शेतकरी घाबरले आहेत. 

वनविभागाला पाहणी करण्याच्या सूचना

याबाबत तहसीलदार समीर माने यांना ग्रामस्थांनी संपर्क केला. तहसीलदार माने यांनी तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या भागाची पाहणी करण्याच्या सूचना केल्या असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT