Registration for purchase of Moog, Urad in Sangli started
Registration for purchase of Moog, Urad in Sangli started 
मुख्य बातम्या

Sangli Market News : सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरू

टीम अॅग्रोवन

सांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा खरेदी-विक्री संघात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरु आहे. आजपर्यंत पाच शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी दिलीप पाटील यांनी केले.

जिल्ह्यात मूगाचे १०४६३ हेक्टर, तर उडदाचे १७०५८ हेक्टर क्षेत्र आहे. सध्या मूग आणि उडीद काढणी सुरु आहे. काही भागात काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यात नाफेडद्वारे मूग व उडीद हमीभाव खरेदी केंद्र सुरु केली आहेत. याची नोंदणी १५ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. बाजार समितीतील विष्णूअण्णा खरेदी विक्री संघात येऊन ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी करताना चालू वर्षाचा पिकपेरा असलेला सातबारा, आधारलिंक असलेले बॅंकेचे पासबूक आणि आधार कार्ड ही कागदपत्रे महत्वाची आहेत. मुगासाठी हमीभाव प्रतिक्विंटल ७ हजार १९६ रुपये, तर उडदासाठी हमीभाव ६ हजार रुपये प्रतिक्विंटल जाहीर करण्यात आला. सध्या जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी नोंदणी केली. 

नोंदणीला अल्प प्रतिसाद

नोंदणी सुरु होऊन दहा दिवस झाले. या दहा दिवसांत फक्त उडदाची विक्री करण्यासाठी पाच शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर, मूग विक्रीसाठी एकाही शेतकऱ्यांने नोंदणी केलेली नाही. वास्तविक, हमीभावाने खरेदी केंद्रावर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नोंदणी सुरु होणे गरजचे होते. नोंदणी उशीरा सुरु झाल्याने त्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.

मूग, उडीद हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी सुरु आहे. सांगलीतील विष्णूअण्णा खरेदी-विक्री केंद्रात येऊन ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.  -दिलीप पाटील, जिल्हा पणन अधिकारी, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT