राऊत, आवाडे, निरानी यांना 'डेक्कन शुगर'चे पुरस्कार
राऊत, आवाडे, निरानी यांना 'डेक्कन शुगर'चे पुरस्कार 
मुख्य बातम्या

राऊत, आवाडे, निरानी यांना 'डेक्कन शुगर'चे पुरस्कार

टीम अॅग्रोवन

पुणे  : डीएसटीए अर्थात डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनकडून दिले जाणारे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. जीवनगौरव पुरस्काराचे यंदाचे मानकरी पांडुरंग राऊत, कल्लपा आवाडे, संगमेश निरानी ठरले आहेत. डीएसटीएचे अध्यक्ष मानसिंगराव जाधव व उपाध्यक्ष एस. एस. गंगावती यांनी शुक्रवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. साखरनिर्मिती क्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या व्यक्तींना डीएसटीएचे पुरस्कार दिले जातात. श्री. राऊत हे नाथ म्हस्कोबा कारखान्याचे अध्यक्ष आहेत. श्री. आवाडे यांनी कोल्हापूरच्या जवाहर कारखान्याच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याशिवाय कृषिभूषण संजीव माने, अशोक खोत (महाराष्ट्र), प्रद्युमन्य अतोदरिया (गुजरात), अशोक पाटील (कर्नाटक) यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. सुधाकर थिगळे, अजित पाटील, विजय खोत, मच्छिंद्र बोखारे, मोहन डोंगरे यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे. एक ऑक्टोबरपासून पुण्यात होत असलेल्या दोनदिवसीय साखर परिषदेत या पुरस्कारांचे वितरण होईल.  एक ऑक्टोबरला सकाळी साडेदहा वाजता हॉटेल हयात रिजन्सीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या हस्ते डीएसटीएच्या ६५ व्या परिषदेचे उद्‍घाटन होईल. या वेळी व्हीएसआयचे महासंचालक डॉ. शिवाजीराव देशमुख, कोईम्बतूरच्या ऊस पैदास संस्थेचे संचालक डॉ. बक्शीराम, कानपूरच्या राष्ट्रीय ऊस संस्थेचे संचालक नरेंद्र अग्रवाल व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित असतील. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, तसेच कर्नाटक व गुजरातचे साखर आयुक्तदेखील परिषदेला येणार आहेत. राज्यातील पूर परिस्थितीमुळे पुण्यात होणारी साखर परिषद यापूर्वी पुढे ढकलण्यात आली होती. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्रातील साखर कारखान्याचे अधिकारी तसेच कारखान्यांना पुरवठा करणाऱ्या कंपन्या व निवडक शेतकरीदेखील परिषदेत सहभागी होतील. डीएसटीएने राज्यात ऊस उत्पादकता वाढ उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे शेतकरी एकरी १०० टनाच्या पुढे ऊस उत्पादन घेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील अशोक खोत यांनी १६७ टनांपर्यंत मजल मारली, असे श्री. जाधव यांनी पत्रकारांना सांगितले. कार्यकारी सचिव एस. एम. पवार, शास्त्रज्ञ डॉ. सुभाष शिंदे, साखर तंत्रज्ञ एस. बी. देव, मुकुंद कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT